WhatsApp

📢 “शिक्षकांसाठी सुट्टी नाही! चुपचाप मतदान काम करा” – चोक्कलिंगम यांचा कडक इशारा!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई |
निवडणूक आणि जनगणनेचे काम हे शिक्षकांसाठी ऐच्छिक नसून अनिवार्य आहे, अशी ठाम भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी घेतली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) पार पडलेल्या विशेष बैठकीत त्यांनी मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतील शिक्षकांची भूमिका स्पष्ट करत, शिक्षक संघटनांच्या सूटविषयक मागण्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला.



या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, आंचल गोयल, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, आणि निवडणूक विशेष अधिकारी विजय बालमवार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


📲 ‘ॲपवरून काम करा, सुट्टी नाही’ – ऑनलाईन यंत्रणेचा फुल्ल वापर

चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं की, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) नेमणुका त्यांच्या मूळ शाळांमध्येच करण्यात याव्यात. त्यांना स्थानीय मतदार नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयात रोज बोलावण्याची गरज नाही. आजमितीला BLO यांच्यासाठी विशेष अ‍ॅप तयार करण्यात आलं असून, त्यावरूनच संपूर्ण कामकाज पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


📉 शिक्षकांचा विरोध – पण आयोग ठाम!

शिक्षक संघटनांकडून ‘निवडणूक व जनगणना कामामध्ये सूट द्यावी’, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र आयोगाने आता हे काम “राष्ट्रीय कर्तव्य” असल्याचे सांगून शिक्षकांची सुटका होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मतदार यादी अद्ययावत करणं ही प्रक्रियेतील प्राथमिक पायरी असून त्यात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही.


📈 वर्षभरात फक्त १०० अर्ज – फारसा भार नाहीच!

चोक्कलिंगम यांनी निदर्शनास आणून दिलं की, प्रत्येक BLO कडे वर्षभरात फक्त १०० अर्ज (फॉर्म) येतात. त्यामुळे यामुळे त्यांच्या मूळ शिक्षकी कामावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यांनी BLO यांची नेमणूक करताना ती त्याच कार्यालय किंवा शाळेच्या कार्यक्षेत्रात करण्याचे आदेशही दिले आहेत. कोणत्याही BLO ला त्यांच्या आस्थापनाबाहेर पाठवू नये, यावर आयोगाचे ठाम मत आहे.


🗳️ पुढील दोन दिवसांत BLO नेमणुका पूर्ण करण्याचे आदेश

अद्याप BLO नेमणुका शिल्लक असतील, तर त्या पुढील दोन दिवसांत पूर्ण कराव्यात, असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये BLO निवडीसाठी आता गती येणार आहे. सर्व कामकाज हे शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.


Leave a Comment

error: Content is protected !!