WhatsApp

🚨 “तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल” – केरळमध्ये उघड झाला भारताविरोधात घातपाताचा कट!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
नवी दिल्ली :
भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणारा एक गंभीर आणि भयावह कट समोर आला आहे. ‘तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल’ – अशा वाक्यांमागे देशाविरोधात रचल्या जात असलेल्या गुप्त कटांची साखळी उलगडली आहे. उत्तर प्रदेश व बिहारमधून तरुणींचं अपहरण करून त्यांना केरळमध्ये नेलं जात आहे. त्यांचं ब्रेनवॉश करून इस्लामी जिहादी विचारधारेकडे वळवलं जात आहे.



या कटामागे सक्रिय असलेल्या टोळ्यांचा उद्देश स्पष्ट आहे. तरुणींना धर्मांतरित करून, हिजाबी बनवून त्यांना जिहादी मिशनसाठी वापरणं. ही संपूर्ण यंत्रणा केरळमध्ये सक्रिय असून, भारतातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे.


📍कशी उलगडली ही धक्कादायक घटना?

एका पीडित तरुणीची केरळ पोलिसांनी सुटका केली. ती प्रयागराजहून दिल्लीमार्गे केरळला नेत असताना तिच्यावर अत्याचार झाला होता. केरळमध्ये नेल्यानंतर तिच्यावर धर्मपरिवर्तनाचा दबाव आणण्यात आला. हिजाब परिधान करण्याचा सराव, इस्लामिक शिकवणी, आणि जिहादी प्रशिक्षण याची सुरुवात झाली.

ती तरुणी घाबरली, आणि संधी साधून रेल्वे स्थानकावर पोहोचली. तिथे तिच्या पाठोपाठ आलेल्या ‘दरकशा’ नावाच्या महिलेशी वाद झाल्यावर टीटीईने हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.


🧠 कटामागे ‘दरकशा’, ‘ताज’ आणि ‘कैफ’ यांचा सहभाग

दरकशा नावाची महिला पीडित तरुणीला घेऊन गेली होती. चौकशीदरम्यान दरकशाने सांगितले की, ताज नावाच्या व्यक्तीने तिला सांगितले होते की मुली हव्यात आणि चांगलं कमिशन मिळेल. ताज हा तिच्या बहिणीच्या दीर असून तो केरळमध्ये काम करतो.

दरकशाने एका आईला पैशांचं आमिष दाखवून मुलीला नेलं. या प्रवासात मोहम्मद कैफ नावाच्या तरुणानेही भूमिका बजावली. या गँगने आधी मुलींना धर्म बदलायला भाग पाडलं, त्यानंतर त्यांच्या ‘ब्रेनवॉश’ला सुरुवात झाली. केरळमध्ये काही अनोळखी लोकांशी त्यांना संपर्कात आणण्यात आलं.


🚨 आतापर्यंत किती तरुणी बळी पडल्या?

या प्रकारात किती मुलींना धर्मांतरित केलं गेलं, त्यांना कुठे पाठवण्यात आलं, आणि त्यांनी किती जणांना जिहादी मिशनमध्ये सामील केलं याचा तपास सुरू आहे. केरळ पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे. ही कारस्थानं किती खोलवर पसरली आहेत, याचा अंदाज घेणंही कठीण होत आहे.


🛑 काय आहे यामागे ‘मोठा’ कट?

सामाजिक माध्यमांपासून मुस्लिम बहुल जिल्ह्यांतील गरीब घरांवर नजर ठेवून, तरुणींना आर्थिक मदतीचं आमिष, नोकरीचं आश्वासन, लग्नाचं आमंत्रण अशा फसव्या गोष्टी सांगून जाळ्यात ओढलं जातं. केरळमधील विशिष्ट गट देशाविरोधात कट रचण्यासाठी अशा तरुणींना वापरत असल्याचा ठपका आता केंद्र सुरक्षा यंत्रणांकडून पडतो आहे.


🔒 सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची पावलं

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एनआयए, इंटेलिजन्स ब्युरो, आणि केरळ एटीएस यांचं एक संयुक्त पथक या नेटवर्कचा तपास करत आहे. विशेषतः ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली तरुणींना धर्मांतरित करून इस्लामिक कट्टर विचारांपर्यंत नेणं, हे देशाच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरत आहे.‘नोकरी’, ‘संपर्क’, ‘भविष्य’ अशा फसव्या गोष्टींच्या आहारी गेलेल्या अनेक मुली आता जाळ्यात अडकत आहेत. एका तरुणीची वेळीच सुटका झाली, पण अजून अशा किती तरुणी कुठल्या ठिकाणी आहेत, हे समजायला वेळ लागणार आहे. केरळमध्ये होत असलेल्या जिहादी घडामोडींकडे देशाने आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!