WhatsApp

महावितरणमध्ये मेगा भरती! १.६६ लाख पगार, फक्त ‘हे’ पात्रता आणि वयोमर्यादा पाहा!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) मध्ये तब्बल १८० पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती पदवीधर अभियंत्यांसाठी सुवर्णसंधी असून, वीज क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये पार पडणार आहे.



पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE किंवा B.Tech पदवी असणे अनिवार्य आहे. इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या शाखांमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयोमर्यादा ३५ ते ४० वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

महावितरणकडून उमेदवारांची निवड ही दोन टप्प्यांत होणार आहे. सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून, त्यानंतर मुलाखत होईल. ऑनलाइन परीक्षेमध्ये एकूण १५० गुणांची चाचणी होणार आहे. यात तांत्रिक ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित क्षमता आणि मराठी भाषेचा समावेश असेल.

परीक्षा पॅटर्न

  • तांत्रिक ज्ञान (इलेक्ट्रिकल/सिव्हिल) : ११० गुण
  • बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) : २० गुण
  • गणित क्षमता (Quantitative Aptitude) : १० गुण
  • मराठी भाषा : १० गुण
  • एकूण गुण : १५०

पगार आणि सेवा अटी

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना अनुभव व पदाच्या श्रेणीनुसार मासिक वेतन रु. ७३,५८० ते रु. १,६६,५५५ पर्यंत दिलं जाईल. सरकारी नोकरीसह लाभ मिळणाऱ्या इतर सवलती आणि भत्ते यांचाही समावेश आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवारांना mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन “New Registration” वर क्लिक करून नवीन खाते तयार करावे लागेल. त्यानंतर अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. अर्ज भरताना शुल्क भरून अंतिम सबमिशन करावे लागेल.

अर्जाची प्रिंट घ्यावी आणि भविष्यातील उपयोगासाठी सुरक्षित ठेवावी. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करावी, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!