WhatsApp

नीरजच्या ‘या’ खणखणीत कामगिरीने पुन्हा एकदा देशाचे नाव झळकवले !

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
८८.१६ मीटर भालाफेक करत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने या वर्षीच्‍या पहिले विजेतेपद पॅरिस डायमंड लीगवर आपल्‍या नावाची मोहोर उमटवली. अंतिम फेरीत ९० मीटरचा टप्‍पा ओलांडू शकला नसला तरी त्‍याने पहिल्‍या थ्रोच्‍या आधारे जेतेपद निश्‍चित केले. २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेतील नीरजचा हा पहिलाच विजय ठरला आहे.



भारताचा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा या ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदास गवसणी घातली आहे. नीरजने डायमंड लीगच्या पॅरिस फेरीत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

यंदाच्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत जूलियन वेबरने नीरजला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र, नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर भालाफेक करून (थ्रो) त्याचं वर्चस्व सिद्ध केलं. या थ्रोमुळे नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. नीरजची आघाडी इतर कोणत्याही खेळाडूला मोडून काढता आली नाही.

नीरजने वचपा काढला



Watch Ad

या विजयासह नीरजने जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जूलियन वेबरचा वचपा काढला आहे. कारण वेबरने डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये नीरजला पराभूत केलं होतं. मात्र पॅरिसमध्ये नीरजने वेबरला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे.

पॅरिस डायमंड लीगचा सामना २० जून रोजी झाला. अंतिम फेरीत नीरजला ६ पैकी फक्त तीनच थ्रो करता आले. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर थ्रो करून चांगली सुरुवात केली.तेव्हा सर्वांच्या नजरा वेबरवर होत्या. त्‍याने त्याच्या सहा प्रयत्नांमध्ये नीरजवर दबाव कायम ठेवला. केशॉर्न वॉलकॉटने अँडरसन पीटर्सला हरवून टॉप थ्रोमध्ये स्थान मिळवले होते .नीरजचा दुसरा प्रयत्न देखील चांगला होता, त्याने ८५.१० मीटर थ्रो केला. यानंतर नीरजने सलग तीन फाऊल थ्रोची हॅटट्रिक केली. , वेबर सुरुवातीला नीरजने ठेवलेला विक्रम ओलांडू शकला नाही. वेबर त्याच्या पहिल्या प्रयत्नापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि ८६.२० मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेत नीरजचा हा पहिलाच विजय होता आणि एकूण पाचवा क्रमांक होता.

Leave a Comment