WhatsApp

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी पुत्र झाला जखमीत; शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
निमकर्दा : पहाटेच्या वेळी इथून जवळच असलेल्या टाकळी गावातील शेतकरी शेतात चक्कर मारण्यासाठी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या आस्वालाने सदर शेतकरी पुत्रावर हल्ला केल्यामुळे रामेश्वर बबन डिवरे हा शेतकरी पुत्र जखमी झाला
सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून दररोज कमी अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्या शेतात पेरणी योग्य पाऊस झाला की नाही हे पाहण्यासाठी सदर शेतकरी पहाटेच्या वेळी घराच्या बाहेर पडला गावापासून थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर काटेरी झुडपातून बाहेर येत सदर अस्वलाने रामेश्वर वर पाठीमागून हल्ला केला त्यामुळे गोंधळलेल्या शेतकरी पुत्राने आपल्या बचावासाठी चक्क अस्वलाशी दोन हात केल्याचे सांगितले या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पाठीवर गालावर कानावर मानेवर पायावर खोलवर जखमा झाल्या असून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सदर शेतकऱ्याला बचावाचा वेळ सुद्धा मिळाला नाही
अस्वलाच्या हल्ल्याची बातमी पंचक्रोशीत पोहचल्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी सध्या भयभीत झाले असून महिलावर्गांनी शेतात जाण्याचे आज रोजी टाळले आहे पेरणीचे दिवस असल्याने गावातील व इतर ठिकाणी पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून या अस्वलाच्या दिसण्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर शेतकऱ्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून वन विभागाची एक टीम टाकळी येथे अस्वलाच्या शोधासाठी सकाळी अकरा वाजता पोचली होती. वन विभागाने शोधाशोध केली असता सदर अस्वल दिसून आले नाही परंतु दुपारी गावकऱ्यांनी अस्वलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा एकदा गावातील माजी सैनिक सत्यपाल वानखडे या व्यक्तीवर आसोलाने हल्ला केला आहे.



Leave a Comment

error: Content is protected !!