WhatsApp


“NCB मध्ये बंपर भरती! इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टरच्या 123 जागांसाठी अर्ज सुरू

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये निरीक्षक (Inspector) आणि उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असून, ही सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे.

या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना मे 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानंतरपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू आहे. विशेष बाब म्हणजे ही एक ओपन व्हेकेन्सी सर्क्युलर आहे म्हणजेच, रिक्त पदे पूर्णपणे भरली जात नाहीत तोपर्यंत अर्ज स्वीकारले जात राहतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट narcoticsindia.nic.in वर भेट देऊन अर्ज करावा.

पदांची माहिती

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असून, येथे सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे.

निरीक्षक (Inspector) – 94

उपनिरीक्षक (Sub-Inspector)- 29

एकूण- 123

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

निरीक्षक पदासाठी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी तसेच गुप्त माहिती संकलनाच्या कार्यामध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

उमेदवार मूळ कॅडर किंवा विभागात समान पदावर नियमित सेवा करत असावा, किंवा पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-06 मध्ये किमान ५ वर्षांची नियमित सेवा केलेली असावी. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा

अर्ज सादर करताना उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार (वेतनश्रेणी)

निरीक्षक (Inspector): पे मॅट्रिक्स लेव्हल-07

उपनिरीक्षक (Sub-Inspector): पे मॅट्रिक्स लेव्हल-06

वेतन केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले जाईल.

भरतीचा प्रकार

ही भरती प्रतिनियुक्ती (Deputation) पद्धतीने केली जाणार आहे.

अर्ज कुठे पाठवायचा?

निरीक्षक (Inspector)

अर्ज पाठवायचा पत्ता : उप महासंचालक (पी अँड ए), नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, वेस्ट ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110066

उपनिरीक्षक (Sub-Inspector)

अर्ज पाठवायचा पत्ता : उप महासंचालक (प्रशासन), नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, दुसरी मजला, अगस्त क्रांती भवन, भीकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली – 110066

प्रत्येक महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या अर्जांवर त्या महिन्याच्या शेवटी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांनुसार विचार केला जाईल.

भरतीशी संबंधित सर्व माहिती व अद्ययावत अपडेटसाठी उमेदवारांनी narcoticsindia.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी

Leave a Comment

error: Content is protected !!