WhatsApp

अकोला रेल्वे स्टेशनवर सकाळच्या प्रहरी प्रवाशांचे मोबाईल चोरीला; पोलिसांच्या जलद कारवाईत ३ चोरटे अटकेत

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १२ जून २०२५ :- आज दिनांक १२ जून २०२५ रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशनवर एकामागोमाग एक असे तीन मोबाईल चोरीचे प्रकार घडल्याने खळबळ उडाली. नागपूर व राजस्थान येथून आलेले प्रवासी ट्रेनची वाट पाहत असताना त्यांचे मोबाईल चोरीस गेले. ही बाब लक्षात येताच संबंधितांनी तात्काळ रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे तक्रार नोंदवली. या प्रकरणातील मुख्य मोबाईल चोरी, अकोला रेल्वे स्टेशन सुरक्षा, रेल्वे पोलिसांची तत्काळ कारवाई, सीसीटीव्ही तपासणी, आणि चोरट्यांची अटक हे कीवर्ड्स या घटनेला केंद्रस्थानी आहेत.



सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन तात्काळ अटक

तक्रारी प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघा संशयितांची माहिती घेतली. त्यानंतर अकोला शहरात सखोल शोध मोहीम राबवून संबंधित तिघांना अटक करण्यात आली. आरोपी अमृतसिंग तरसेनसिंग बढे, रा. इराणी झोपडपट्टी, अकोला, शेख सादिक शेख खालिक, रा. नायगाव, अकोला, शेहबाज खान सुलेमान खान, रा.अकोट फईल अकोला पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४ मोबाईल आणि ३,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ६९,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या यशस्वी कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज ढोके, हवालदार सुशिल सांगळे, विलास पवार, संतोष वडगीरे, सतिश जवंजाळ, कपिल गवई, विजय शेगावकर, तुषार गोंगे, विजय जगणित आणि रेल्वे सुरक्षा बलाचे पंकज गवई यांचा मोलाचा सहभाग होता.

पोलीस तपास सुरूच; आणखी चोरी उघडकीस येण्याची शक्यता

सदर आरोपींना मा. न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली असून, त्यांनी याआधी देखील अशा प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कार्यवाही होत आहे.

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे प्रवास करताना आपली मौल्यवान वस्तू, मोबाईल, पर्स यांची योग्य काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमचं मत, तुमच्या अडचणी आता सर्वांपर्यंत पोहोचतील !

तुमच्या आसपासची कोणतीही घटना, समस्या, तक्रार, बातमी, अडचण, किंवा सामाजिक प्रश्न तुमच्याकडे असल्यास आम्हाला पूर्ण माहिती आणि फोटो/व्हिडीओसह
👉 https://tinyurl.com/3mb7zrjj 👈 या लिंक वर क्लिक करून पाठवा. आमचं न्यूज चॅनल तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवेल !

[कॉपीराईट © 2025 | ANN Akola News Network]

Leave a Comment

error: Content is protected !!