WhatsApp

अकोलामधील जवाहर नगरमध्ये कुदळीने हत्या; डोक्यात घातलेल्या वाराने ठार, फरार आरोपीस पोलिसांनी ऐका तासातच केली अटक

Share

अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार २ जून रोजी रात्री कुदळीने डोक्यात प्रहार करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संजय कौशल असून आरोपी महेंद्र पवार फरार आहे. पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.



जवाहर नगरमध्ये डोक्यात कुदळी घालून थरारक हत्या

अकोला शहरातील गजबजलेल्या आणि वस्तीवाढीच्या टप्प्यावर असलेल्या जवाहर नगर परिसरात सोमवार २ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेली ही थरारक हत्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली. संजय कौशल (फ्लॅट नं. ३०२) हे मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते, तर आरोपी महेंद्र पवार (फ्लॅट नं. ३०६) हा देखील याच इमारतीत राहतो. दोघांमध्ये आधीपासूनच किरकोळ वाद होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

रात्री ८ वाजता पुन्हा एकदा वाद उफाळून आला. आधीच्या भांडणात हाणामारी झाली आणि अचानक महेंद्र पवारने ताब्यातील कुदळीने संजय कौशल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात संजय कौशल खाली कोसळले.
स्थानिकांनी तत्काळ त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

घटनास्थळावरुन आरोपी फरार, मात्र पोलिसांनी काही तासातच आरोपीस केली अटक

या खून प्रकरणानंतर आरोपी महेंद्र पवार घटनास्थळावरून फरार झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस सक्रिय झाले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आणि गुन्हे शाखा तपासासाठी दाखल झाले.

Watch Ad

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर आरोपी महेंद्र पवार यास अटक केली असून फॉरेन्सिक तपासाद्वारे हत्येच्या आधी आणि नंतरच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

प्राथमिक माहितीनुसार, वादाचे नेमके कारण वैयक्तिक व शेजारी संबंधांतील वाद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीस अधिकृतपणे यावर भाष्य करण्यास टाळत आहेत.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारची हत्या घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मुरलीधर टॉवरसारख्या निवासी संकुलात देखील सुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष समोर येत आहे. पोलीस खात्याने लवकरात लवकर आरोपीला अटक करावी आणि परिसरात सतर्कता वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अकोला शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिक सजग राहावेत आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या पोर्टलला भेट देत राहा. तुमचे मत खाली कमेंटमध्ये जरूर नोंदवा.

Leave a Comment

error: Content is protected !!