अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ एप्रिल २०२५:- जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे पाकधार्जिण्या अतिरेकी मुस्लीमांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड गोळीबार आणि हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानवी आणि कायर हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी अकोट तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले.
शिवसेना पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार हे आंदोलन शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. अकोट तालुक्यातील विविध गावांमधून आलेले शिवसैनिक, युवासेना कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.
या निषेध आंदोलनादरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “भारत माता की जय”, “अतिरेक्यांचा नाश होवो” अशा घोषणा देत देशद्रोही वृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानचे प्रतिकात्मक फलक जमिनीवर ठेवून त्यांना पायाखाली तुडवण्यात आले. या कृतीद्वारे कार्यकर्त्यांनी आपल्या देशभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा रोष व्यक्त केला.

या आंदोलनात फक्त शिवसेना-युवासेनेच नव्हे तर अकोट तालुक्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकत्र येऊन त्यांनी एक सुरात देशद्रोह्यांच्या विरोधात आवाज उठवला.
अकोट शहरातील प्रमुख चौकात हे आंदोलन पार पडले. परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेत परंतु जोशपूर्ण वातावरणात आंदोलन केले. या वेळी पोलिस प्रशासनाची दक्षता पाहायला मिळाली.
अकोट तालुक्यातील नागरिक, विशेषतः युवा वर्गाने या आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडियावरही या निषेध आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. “देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमी सज्ज आहोत,” असा संदेश यामधून देण्यात आला. देशात पर्यटनासारख्या क्षेत्रात वाढ होत असताना अशा अतिरेकी हल्ल्यांमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होऊ शकते. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने या घटनांचा मुळापासून बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया:-उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे
“पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला हा फक्त त्या व्यक्तींवर नव्हे तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि शांततेवर झालेला घात आहे. अशा हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर धडा शिकवावा.”
