आयसीसी विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकाविणारा ऑस्ट्रेलिया संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियातील फोटोवरून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल मार्शला ट्रोल केले जात आहे. भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज मिशेल मार्शचा उद्धटपणा समोर आला.
मिशेल मार्शचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून क्रिकेट चाहते संतप्त झाले आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात भारताचा दारूण पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये विश्वचषक ठेवण्यात आला होता. या फोटोत मार्श हा विश्वचषकावर पाय ठेवून निवांतपणे बसलेला दिसत आहे. फोटोमध्ये मिशेलच्या चेहऱ्यावरील अंहकार स्पष्टपणे दिसत आहे. हाताची मुठ आवळून तो जिंकल्याचा उद्दामपणा दाखवित आहे.
क्रिकेटप्रेमीकडून आश्चर्य व्यक्त- मिशेलचा फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी समाजमाध्यात प्रतिक्रिया दिली. सामना जिंकल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना विश्वचषकाचा सन्मान करण्याची आठवण राहिली नाही का? असा क्रिकेटप्रेमी प्रश्न विचारत आहेत. मिशेलसोबतच ऑस्ट्रेलियाची स्पोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडुही दिसत आहेत. मात्र, त्या खेळाडूंनी मिशेलच्या आक्षेपार्ह कृत्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही. याबाबत क्रिकेटप्रेमीदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कमीत कमी विश्वचषकाचा सन्मान करा- सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी ‘शेम ऑन यू मार्श’ असं म्हटलं आहे. क्रिकेट चाहत्यांना विश्वचषकाचा अपमान मुळीच रुचला नाही. त्यामुळे संतप्त क्रिकेट चाहते आपल्या भावना सोशल मीडियात व्यक्त करत आहेत. काही क्रिकेट चाहत्यांनी एक्सवर मार्शला गुंडा म्हटले आहे. तर दुसऱ्या क्रिकेट चाहत्याने कमीत कमी विश्वचषकाचा सन्मान करा, असं म्हटलयं. एका क्रिकेट चाहत्यानं म्हटलं, हा फोटो क्रिकेटपटू मिच मार्श याचा आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्स यांनी शेअर केला. गुजरातच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना बीयरदेखील जाऊ शकते, असा टोलादेखील लावला.
अंतिम सामना पराभूत झाल्यानं चाहत्यांची निराशा- सलग दहावेळा सामन्यात विजय मिळविल्यानंतर अंतिम सामन्यात भारत विश्वचषक जिंकेल, अशी भारतीयांना अपेक्षा होती. मात्र, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं दमदारी खेळी करत कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न भंग केले. ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया हा भारताचा परंपरागत क्रिकेटमधील प्रतिस्पर्धी संघ आहे. मात्र, अनेपेक्षितपणे भारताचा पराभव झाल्यानं क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली.
Hello just wanted to give you a brief heads up and let you know a few
of the pictures aren’t loading properly. I’m not sure why but I think its a linking
issue. I’ve tried it in two different browserss and bofh show the
same outcome.
Heere is my homepage – https://www.Waste-ndc.pro