अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ९ मार्च २०२५:-जागतिक महिला दिनानिमित्त अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल, ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे तसेच मोठ्या संख्येने अकोट उपविभागातील हिवरखेड, दहीहंडा, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन महिला पोलीस कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी पत्नी परिवार यांची उपस्तिथी होती.

कार्यक्रमाची सुरुवात महिलांसाठी प्रेरणादायी उद्बोधनाने झाली. महिलांच्या हक्क, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेवर मान्यवरांनी आपले विचार मांडले. पोलिस दलातील महिलांचे योगदान आणि त्यांचे सशक्तिकरण यावरही भर देण्यात आला.
यावेळी महिलांसाठी विशेष जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटला आणि साहसाचा अनोखा अनुभव घेतला. जंगल सफारी व्यतिरिक्त विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांनी या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि दिवस संस्मरणीय केला.
कार्यक्रम पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल याचे मार्गदर्शनाखाली, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, सहायक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पोलीस विभाग सातत्याने असे उपक्रम राबवत आहे. महिलांच्या सहभागाने आणि आनंदमयी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग सदैव तत्पर असून, अशा उपक्रमांद्वारे महिलांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिला सशक्तीकरणाची नवी दिशा
हा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आयोजित करण्यात आला होता. जंगल सफारीसारख्या उपक्रमांमुळे महिलांना वेगळ्या पद्धतीने आनंद घेण्याची संधी मिळाली. तसेच, खेळांमधून त्यांनी सहकार्य, उत्साह आणि नवी ऊर्जा अनुभवली.
या कार्यक्रमाने महिलांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, पोलिस विभागाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीवही अधोरेखित झाली. महिलांसाठी असे उपक्रम भविष्यातही आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचा उत्साहात साजरा करून महिलांना एक वेगळा अनुभव दिला. या उपक्रमाने महिलांचे मनोबल वाढवण्यास मदत झाली आणि समाजात महिलांच्या स्थानाचे महत्त्व अधोरेखित झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सशक्तीकरणासाठी पोलीस प्रशासन कायम प्रयत्नशील राहील, असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
