WhatsApp


Anty corruption :-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: सरपंच पती १,०००/- रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २८ फेब्रुवारी २०२५:- अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सालतवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पती देवानंद जामनिक यांना १,०००/- रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

बक्षीसपत्राची नोंद करण्यासाठी लाचेची मागणी तक्रारदार यांच्या वडिलांनी सालतवाडा येथील घर बक्षीसपत्राद्वारे त्यांच्या नावावर केले होते. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या अभिलेखात त्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला. मात्र, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सीमा जामनिक यांच्या पतीने ही नोंद करण्यासाठी ३,०००/- रुपयांची लाच मागितली

लाचलुचपत विभागाची सापळा कारवाई

तक्रारदाराने ही माहिती अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुर्तिजापूरच्या आंबेडकर चौकात सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान सरपंच पतीने तडजोड करत १,०००/- रुपयांवर सौदा केला. अखेर २७ फेब्रुवारी रोजी मुर्तिजापूर एस.टी. स्टँड येथे आरोपी देवानंद जामनिक यांनी तक्रारदाराकडून १,०००/- रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी ACB अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

पुढील कारवाई सुरू

या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि टीम

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक श्री. सच्छिंद्र शिंदे, ACB अमरावतीचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. नागरिकांसाठी आवाहन लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणीही शासकीय कामांसाठी लाच मागितल्यास त्वरित अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला कार्

Leave a Comment

error: Content is protected !!