अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी सुरज देशमुख दिनांक २४ फेब्रुवारी २०२५:- दर्यापूर तालुक्यातील शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे! युवतीसेना दर्यापूर तालुक्याच्या वतीने शिवमंदिरात विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते मा. आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवतीसेना विभागीय सचिव पियुषीकाताई मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व युवतीसेना दर्यापूर तालुकाप्रमुख सोनालीताई प्रतिक राऊत यांनी घेतले असून, त्यानिमित्त शिवमंदिराची स्वच्छता करून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. या उपक्रमात युवतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, मंदिर परिसर स्वच्छतेसाठी समर्पित भावनेने सेवा देत आहेत.
याशिवाय, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर २६ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री डोमनशेष महाराज संस्थान, उपराई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी युवतीसेनेच्या कार्यकर्त्यांकडून योग्य ते नियोजन केले जात आहे.
या पवित्र कार्यात युवतीसेना दर्यापूर तालुकाप्रमुख सौ. सोनालीताई प्रतिक राऊत, मंजुताई कावरे, राणी ताई सोनोने, वर्षाताई राऊत, वैष्णवी कैकाडी तसेच अनेक युवती व महिला कार्यकर्त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.
शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन स्वच्छता अभियानास हातभार लावावा व महाशिवरात्री निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवतीसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या या उपक्रमामुळे समाजात स्वच्छता आणि भक्तिभाव वाढविण्यास हातभार लागणार असून, दर्यापूर तालुक्यातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता युवतीसेनेच्या प्रयत्नांचे कौतुक करावे तितके थोडेच!