WhatsApp


AKOT संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव: लाखो भाविकांचा जनसागर, सजल विहिरीवर भक्तीचा महापूर!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २१ फेब्रुवारी २०२५:- अकोली जहागीर (अकोट) येथील श्री संत गजानन महाराज संस्थान, शांतीवन अमृततीर्थ, सजल विहीर परिसर गुरुवारी प्रकट दिनानिमित्त भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. लाखो भाविकांनी श्री संत गजानन महाराज व सजल विहिरीचे दर्शन घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले.

सकाळी ४ वाजल्यापासूनच पायदळ वारीतील भक्तांची गर्दी सजल विहीरकडे मार्गस्थ झाली. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत १२ तास उलटल्यानंतरही या रांगा अविरत सुरू होत्या.

प्रकट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या रजत मुखवट्याच्या पालखीची नगरपरिक्रमा काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांच्या काल्याच्या किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. महायज्ञ अनुष्ठानाची पूर्णाहुतीही भक्तिभावाने पार पडली.

यंदाच्या प्रकट दिन यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग घेतला. सजल विहीर परिसरातील नवीन २० हजार स्क्वेअर फूट क्षमतेचे सभागृह भाविकांसाठी खुलं करण्यात आलं, जिथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर महाप्रसाद आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने चहा, लिंबू सरबत, फळं आणि फराळ वाटप करण्यात आले.

भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्ननसिंग, उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल आणि ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

भाविकांसाठी मोफत वाहतूक सेवा

अकोट येथून येणाऱ्या भाविकांसाठी चालक-वाहक संघटनेने मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली. हजारो भक्तांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि श्रींच्या दर्शनाचा आनंद घेतला.

Leave a Comment

error: Content is protected !!