अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ४ फेब्रुवारी २०२५:- अकोट ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ग्राम मुंडगाव येथे गोवंश मास विक्री प्रकरणी मोठी कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले असून, एकूण ३४,८२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, ग्राम मुंडगाव येथील चंद्रीका नदीच्या काठावर एका इसमाकडून गोवंश मासाची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे ठरवले.पोस्टे अकोट ग्रामीण पोलिसांनी पंचासह घटनास्थळी छापा टाकला असता, मोहम्मद आसिफ मोहम्मद हारूण (वय ३९, रा. दहिहांडा, जि. अकोला) हा शिवबाभूळच्या झाडाखाली गोवंश मासाची विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आणि मुद्देमाल जप्त केला.
कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी घटनास्थळी सखोल तपास करून खालील मुद्देमाल जप्त केला:
१७० किलो गोवंश मास – अंदाजे किंमत ₹३८,०००/-, लोखंडी वजन काटे, जुना लोखंडी वजन काटा, ५०० ग्रॅम लोखंडी वजन, २०० ग्रॅम, लोखंडी वजन४ प्लास्टिक पोती एकूण ३४,८२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५४/२५ नोंदवण्यात आला आहे. संबंधित आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम १९६० अंतर्गत कलम ५, ५(क), ९, आणि ८(३t) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची भूमिकाही कारवाई
मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोलीस हवालदार निलेश खंडारे, पोलीस हवालदार शिवकुमार तोमर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कांबळे, तसेच अन्य पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
गोवंश मास विक्री प्रकरणे आणि कायदा
भारतात गोवंश हत्या आणि मास विक्रीवर अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध आहेत. महाराष्ट्रातही गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा, १९७६ आणि प्राणी संरक्षण अधिनियम, १९६० अंतर्गत कठोर कारवाई केली जाते. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकतो.
स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ग्राम मुंडगाव आणि परिसरातील जनतेने पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, अशा घटनांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.सध्या पोलिस अधिक तपास अकोट ग्रामीण पोलीस करत आहे.