ANN अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ :- Pan Card Update पॅनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आली आहे. लवकरच पॅनकार्ड बंद होणार आहेत. त्याऐवजी नवे पॅनकार्ड काढावे लागणार आहेत. पण हे सर्व पॅनकार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांनाच पॅनकार्ड बदलावे लागणार आहेत. याबद्दलचा आध्यादेश भारत सरकारने काढला आहे. काय आहे नक्की हे प्रकरण जाणून घेऊयात.
भारत सरकारने पॅन 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचे Pan Card Update पॅनकार्ड बदलावे लागणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे. सरकारच्या मंजुरीनंतर त्यांचा पॅन क्रमांकही बदलणार का? आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल, असा प्रश्न करदात्यांच्या मनात निर्माण होत आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पॅन कार्डची नवीन आवृत्ती नवीन फिचर्सनी सुसज्ज असेल. पण, तुमचा पॅन क्रमांक तोच राहील. Pan Card Update या कार्डवर एक QR कोड दिला जाईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल. त्याचा वापर करून आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Pan Card Update नवीन कार्ड कोठे बनवायचे?
केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणतात की, पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना विभागाकडून नवीन पॅनकार्ड पाठवले जातील.
Pan Card Update जुने कार्ड बंद होणार का?
पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत क्रमांक बदलले जाणार नाहीत, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. प्रत्येकाचा पॅन क्रमांक सारखाच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅनकार्डच्या माध्यमातून करता येतील. नवीन कार्डसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. सरकारकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय करण्यात आली आहे.
Pan Card Update कसे असेल नवे पॅनकार्ड ?
- पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून त्याचा वापर करणे सोपे होईल.
- सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट केली जातील.
- पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केले जाईल, जे वापरकर्त्याचा अनुभव सुधारेल.
- वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल.