WhatsApp

Akola Vidhan Sabha अकोला जिल्ह्यात निवडणूक विभागाची मोठी कारवाई, कारच्या स्टेपनी मधून जप्त केली लाखोंची रोकड

Share

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक ३१ ऑक्टबर गणेश बुटे विशेष प्रतिनिधी :- राज्यात सध्या विधानसभा निवडनुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, या आचारसंहितेत पैशांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. निवडणुकीत पैशांचा होणारा गैरवापर लक्षात घेता पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे



अकोट रस्त्यावर देवरी फाट्याजवळ निवडणूक विभागाने नाकाबंदी दरम्यान पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. कारच्या स्टेपनीत ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात निवडणूक काळातील सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

३० ऑक्टोबर रोजी अकोट रस्त्यावरील देवरी फाट्याजवळ निवडणूक विभागाच्या पथकाने एका कारमधून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली. या नाकाबंदी दरम्यान कारच्या स्टेपनीमध्ये लपवून ठेवलेली ही रक्कम मिळाली. या प्रकरणात मनोज ब्राह्मणकर, नायगाव (जि. बुलढाणा) याच्याकडून ही रोकड जप्त करण्यात आली.

शेगाव मार्गावरून ही रक्कम अकोट मतदारसंघात नेली जात होती. निवडणूक काळातील अशा हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात असलेल्या निवडणूक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर बिडकर, एस. आर. ठाकरे, अभिषेक दामोदर, आणि आर. बी. राठोड यांच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी केली.



Watch Ad

या कारवाईमुळे परिसरात निवडणूक काळातील सुरक्षेवर तणाव निर्माण झाला आहे. यासारख्या घटनांमुळे निवडणूक काळात बेकायदा व्यवहारांवर प्रशासनाचे कठोर लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment