तामिळनाडूतील चार आरोपींना अकोला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रामदास पेठ परिसरातील खेमका अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने अधिवक्ता प्रफुल्ल सुरवाडे यांचा युक्तिवाद मान्य करून त्यांची तुरुंगातून सुटका केली.
रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत रतनलाल प्लॉट येथे असलेल्या खेमका अपार्टमेंटमध्ये काही काळापूर्वी झालेल्या मोठ्या चोरीप्रकरणी तामिळनाडूचे चार रहिवासी आरोपी पकडण्यात आले होते. या आरोपींची नावे मुनिप्पम कुय्याम, शिवा कुप्पम, वीणा नारायण, आणि व्यंकटेश नारायण शिवा अशी आहेत. या आरोपींनी अपार्टमेंटमधील अनेक महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या होत्या.
या प्रकरणात अकोला न्यायालयाच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयात अधिवक्ता प्रफुल्ल सुरवाडे यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला आणि त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे तामिळनाडूतील वेल्लोर येथे राहणाऱ्या या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.