ऑपरेशन प्रहारचा जोरदार फटका! पातूर तालुक्यात अवैध दारूविरुद्ध मोठी कारवाई; १,९२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध दारूचा साठा उद्ध्वस्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आलेगाव येथे अवैध दारूवर छापा

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम आलेगाव येथे पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी देवदत्त सुखदेव तेलगोटे (वय ५०, रा. आलेगाव, ता. पातूर) याच्या ताब्यातून अवैधरित्या साठवलेला

  • ४५० लिटर मोहमाचा सडवा (किंमत ₹६७,५००)
  • ३० लिटर हातभट्टी दारू (किंमत ₹६,०००)
    असा एकूण ₹७३,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंधार सांगवी येथे प्रोव्हिजन रेड

दुसरी कारवाई ग्राम अंधार सांगवी येथे करण्यात आली. येथे आरोपी प्रकाश यादव झटाले (वय ४५, रा. अंधार सांगवी, ता. पातूर) याच्या ताब्यातून

  • ७५० लिटर मोहमाचा सडवा (किंमत ₹१,१२,५००)
  • हातभट्टी दारू (किंमत ₹६,०००)
    असा एकूण ₹१,१८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे दाखल, तपास सुरू

दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे चान्नी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांची ठाम कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक (रेड्डी), तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत API विजय चव्हाण, HC महेंद्र मलिये, HC माजीद, HC रवी खंडारे, HC वसीमोद्दीन, HC खुशाल नेमाडे, PC धिरज वानखेडे आणि चालक HC कमलाकर (स्थानीय गुन्हे शाखा, अकोला) सहभागी होते.

‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध दारूविरुद्ध पोलीस प्रशासनाने घेतलेली ही ठोस भूमिका जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांना चाप लावणारी ठरत असून, पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment