WhatsApp


Akola Accident मुर्तीजापुर-कारंजा रस्त्यावर रॉंग साईडवरून स्विफ्ट कारने ऑटोला दिली जबर धडक, दोघांचा मृत्यू!

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो संतोष माने प्रतिनिधी मुर्तीजापुर दिनांक 23 मे : Akola Accident आज सकाळी मुर्तीजापुर-कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळ डॉ. कांबे यांच्या डेंटल कॉलेज समोर आज सायंकाळी पाच वाजताच्या एका भयानक अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यावर जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, अमोल खंडारे आणि बादशाह यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी Akola Accident प्रवाशांना आणि ऑटो चालकाला तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डा येथून मुर्तीजापुरकडे प्रवासी घेऊन येणारा ऑटो क्रमांक एमएच 37 जी 572 हा मुर्तीजापुरकडून कारंजाकडे जात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक एमएस 37 वी 5210 या गाडीला समोरासमोर धडकला. Akola Accident स्विफ्ट कार चालक मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याचे स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या खिशातून दारूची बाटलीही सापडली आहे.

या अपघातात ऑटो चालक अमर सुरेश फुलझेले (वय 35), विश्राम सुरेश जाधव (वय 50) आणि दीनानाथ रामराव पवार (वय 12) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर उजावंती विश्राम जाधव (वय 40) आणि दिव्या अजय पवार (वय 3) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. Akola Accident

Akola Accident ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्विफ्ट कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मृत महिलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वाहन चालवून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!