अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १९ मे :- Akola Accident अकोला जिल्ह्यात आज रविवार हा काळा रविवार ठरला असून आज दोन वेगवेगळ्या अपघात पाच जण ठार झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली यातील पहिला अपघात हा पातूर जवळ चिखलगाव रस्त्यावर चारचाकी व ट्रकचा झाला तर दुसरा अपघात हा तेल्हारा बेलखेड रोड वर दोन दुचाकीचा अमोरसमोर झाला यात चार झन ठार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे.
पहिला अपघात Akola Accident
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात चिखलगाव रस्त्यावर आज एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सैन्य दलातील एका जवानाचा मृत्यू झाला तर दोखे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना चिखलगाव परिसरात घडली असून या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम महामार्गावरून जात असलेल्या एका ट्रकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत कार पूर्णपणे क्षतविक्षत झाली. कार मधून प्रवास करणाऱ्या एका सैनिकासह तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या अपघात जखमी सैनिक
लगेचच 108 रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली. पत्रकार दूल्हे खान, 108 चे चालक सचिन बारोकर आणि डॉ. फुरकानउद्दीन यांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमींना रुग्णवाहिकेत बसवून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पोहोचविले. तथापि, जवान विशाल गुलाब तायडे यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गंभीर स्वरूपाच्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. पातुर पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेल्या विशाल तायडे यांच्या अकाली मृत्युने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण सैनिक बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. ही घटना सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ठरणारी आहे. सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यपालन करावे लागते. मात्र अशा अपघातांमुळे त्यांच्यावर आणखी मोठा ताण पडणार आहे.
तसेच असेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळेही अशा दुर्घटना घडत राहतात. रस्त्यावरील अतिवेगामुळे किती मोठी दुर्घटना घडते, हे या अपघातावरून स्पष्ट होते. अशा अपघातांना रोखण्यासाठी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे असून वाहन चालकांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणे अपेक्षित आहे. तसेच अशा अपघातांमुळे पीडितांना योग्य वेळेत उपचार मिळणेही महत्वाचे ठरते.
तेल्हारा बेलखेड दुसरा अपघात चार ठार Akola Accident
दुसरा अपघात आज तेल्हारा तालुक्यातील बेलखेड रस्त्यावर एक भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हाहाकार माजला आहे. अपघाताची माहिती अशी की, पांचगव्हण येथील एक कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांची दुचाकी क्रमांक MH 30 AU 7419 होती. समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर त्यांची सुसाट वेगाने जाणारी दुचाकी आदळली.
दोन्ही दुचाकी प्रचंड वेगात असल्याने त्यांचा चकनाचूर झाला आहे. या भिषण अपघातात चारजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात आशिक खान कुदरत खान वय 35 वर्ष अमरा खातून अशी खान व आठ वर्ष मुलगी दुसरा खान अशी खान वय पाच वर्ष मुलगी सायमा खातून अशी खान वय 30 वर्ष पत्नी या सर्वांचा घटना स्थळीच मृत्यू झाला घटनास्थळावर रक्ताचा थैमान पसरला होता. अपघाताचे भिषण दृश्य दिसत होते.
अशा घटना खूपच धक्कादायक असतात. याकरिता वाहन चालकांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. वेगवान वाहने चालवताना कशाप्रकारची अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पनाच करणे कठीण जाते. वेगवान वाहनांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होत असतो. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वाहनचालकांनी वेगवान वाहने न चालवता जीवित राहण्याचा पर्याय निवडावा. तसेच नागरिकांनीही या अभयारण्यात असणाऱ्या वाहतूक प्रश्नांबाबत सरकारला भाग पाडावे.
तिसरा तेल्हारा शहरात विचित्र अपघात १ जण ठार Akola Accident
तर तिसरा आणि विचित्र अपघात आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तेल्हारा शहरात येणाऱ्या संत तुकाराम चौकात घडला. तेल्हारा येथील संत तुकाराम चौकात भंबेरी येथील श्याम गोसावी हा इसम दारू पिऊन बसला होता भर चौकात दारू पिऊन रस्त्यात बसणे या इसमाच्या चागलेच अंगलट आले असून याला आपल्या जीवास मुकावे लागले याच रस्त्यावरून क्रेन जात असता हा ३५ वर्षीय श्याम अचानक या क्रेंनच्या समोर आल्याने त्याला जबर धडक बसली या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या श्याम गोसावी याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले अधिक तपास केला असता ३५ वर्षीय इसम हा भांबेरी येथील रहिवासी असून श्याम गोसावी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.
आजचा रविवार हा जिल्ह्यासाठी काळ वार ठरला असून पातूर तालुक्यातील चिखलगाव येथे सैनिकाचा अपघाती मृत्यू झाला तर तेल्हारा बेलखेड रोडवर झालेल्या अपघातात दोन चिमुकल्या मुली व दोन जण असे चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आणि तिसरा विचित्र अपघात तेल्हारा शहरात घडला असून या अपघातात देखील ३५ वर्षीय युवकाला आपल्या जिवाला मुकावे लागले असून या तीनही अपघातामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.