अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २५ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीतही पावसाने आपला सहभाग नोंदविला असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अर्धे अकोला जिल्हा अंधारात बुडाला आहे. सायंकाळनंतरच्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर फटक्यास सामोरे जावे लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अकोल्यातील शेतकऱ्यांची कंबरडी मोडली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तापमानात वाढ झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे थंडावा निर्माण झाला असला तरी त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. उलट पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अकोला जिल्ह्यात सलग आठ दिवसांन पासून अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून अकोलकर हैराण तर शेतकरी पिकाचे नुकसान होत असल्याने पारेशान झाला आहे आज देखील रात्री आठ वाजल्याच्या दरम्यानच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने देखील आपला सहभाग यात नोंदविला असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. पावसाचे आगमन होताच नियमांना प्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाला असून अर्धे शहर तसेच ग्रामीण भाग हा आंधरात बुडला आहे.
निवडणूक असो की नसो, अकोला जिल्ह्यातील शेतकरी वर्ग निसर्गाच्या या कोपामुळे नेहमीच आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे.