अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २४ एप्रिल :- वतमाळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणार होता. तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले.
त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली.
भरसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ
यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं. आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी त्यांना सावरलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. यानंतर गडकरींनी विश्रांती घेतली आणि त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. शिवसेनेच्या राजश्री पाटील या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत.
सध्या विदर्भात उन्हाचा पारा ४२ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त जात असून या उष्णतेमुळेच गडकरींना भोवळ आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान भोवळ आल्यानंतर काही वेळातचं गडकरींना बरं वाटयाला लागताच ते पुन्हा भाषणासाठी मंचावर आले आणि त्यांनी सभेसला संबोधित केलं.