Akola Lok Sabha Election 2024 अकोल्यातील रामनवमी उत्सवात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांनी विशेष सहभाग घेतला. त्यांनी प्रभू श्रीरामाची महिमा गाजवून, रामायणातील मूल्यांचा गौरव केला. अनेक ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन डॉ. पाटील यांनी प्रभू रामचरितमानसाचे स्मरण करून दिले.
“आधी पूजन श्रीरामाचे” या उक्तीप्रमाणे डॉ. पाटील यांनी टिळक रोडवरील प्राचीन व ऐतिहासिक श्रीराम मंदिरात प्रभू रामरायाचे दर्शन घेतले. यावेळी अनेकांनी त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. गांधी चौकातील राम उत्सव समितीच्या कार्यक्रमातही त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
सकाळी राजेश मिश्रा यांच्या श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीची स्कुटर रैली पाहण्यासाठी डॉ. पाटील उपस्थित होते. या रैलीत आ.नितीन देशमुख, राजेश मिश्रा, मनोज बिसेन, मंगेश काळे, मुन्ना मिश्रा, तरुण बगेरे, नितीन मिश्रा, बोरकर आदी उपस्थित होते. संपूर्ण महानगरात रामायणाची महिमा साकार करणारी ही रैली डॉ. पाटील यांनी पाहिली.
सायंकाळी जठारपेठ परिसरातील राम उत्सवातही सहभागी होऊन डॉ. पाटील यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. महानगरातील ऐतिहासिक श्रीरामजत्रेत त्यांची उपस्थिती विविध मंडळांना कार्याची प्रेरणा देत होती.
यावेळी श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीचे उकर्डे, निहार अग्रवाल, आशु वानखडे, संजय अग्रवाल, तरुण बगेरे, शरद तुरकर, गजानन चव्हाण, विक्रम परमार, राजकुमार शर्मा, मनीष बिसेन आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी आपल्या प्रचारातून वेळ काढून या उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, दृष्टांचा नाश व सत्याची पुनर्स्थापना या भूतलावर करण्यासाठी भगवान श्रीरामाची महिमा अपरंपार आहे. प्रभू रामच जगाचे उद्धारक आहेत, असे विचार त्यांनी व्यक्त केले