WhatsApp

Lok Sabha Election 2024 प्रकाश आंबेडकर यांनी मानले भाजपचे आभार?वंचित च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात माहिर आहोत

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १० एप्रिल :- Lok Sabha Election 2024 राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून रोज नवनवीन धक्के राजकारणात मिळत आहेत कोणी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे तर कोणी तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोरी करीत आहेत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते अकोला लोकसभा निवडणुकीवर कारण या ठिकाणावरून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर येथून स्वतः निवडणूक लढत आहेत त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे.



आज प्रकाश आंबेडकर यांनी दुपारच्या सुमारास अकोला येथे पत्रकार परिषद घेतली असून भाजप ने सेल्फ पोल केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या वेळी त्यांनी मनसे व शिवसेनेवर टीका केली ते म्हणाले मुंबई सारख्या शहरामध्ये मनसे असो अथवा शिवसेना या दोन्ही पक्षांनी विविध आंदोलने केली उत्तर भारतीय नागरिकांना मुंबई मध्ये मारहाण तर केलीच त्या व्यतिरिक्त छट पूजेला देखील विरोध दर्शविला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला.

त्या मुळे बिहार मधील जनता व कार्यकर्ते यांना भाजप सुरक्षित वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटत असून अनेक जणांनी आम्हाला आता वंचित मध्ये यायचे असल्याचे संकेत प्राप्त होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मनसे ही भाजप ला पाठिंबा देईल याची मला आधीच खात्री होती त्याच मुळे आपल्या पक्षाने मुंबई येथील उमेदवार घोषित केला नव्हता उद्या संध्याकाळ पर्यंत आता वंचित बहुजन आधडी आपले उमेदवार निश्चित करून संपूर्ण चित्र स्पष्ट करतील असे देखील आंबेडकर बोलले

Lok Sabha Election 2024 वंचित च्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात माहित आहोत.



Watch Ad

निवडणुकीच्या रणधुमाळीत विजय वडेट्टीवर यांनी वांचीतला हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडले असे वक्तव्य केले होते त्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी चोख उत्तर दिले असून निवडणुकीत सिटांच्या वाटप होत असते त्यामुळे त्यांनी या विषयावर काही बोलूच नये आम्ही जर बोलायला लागलो तर फार भारी जाईल वंचित च्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात महिर आहोत असे या पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.

Leave a Comment