अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १ एप्रिल दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी :- Akola Crime अकोला जिल्ह्यातील पिंजर परिसरात गांजा तस्करांच्या कारवायांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गुप्त बातमीवरून कारवाई करत पोलिसांनी टिटवा गावातील तलावाजवळ दोन तरुणांकडून ३ लाख ८४ हजार ३४० रुपयांचा १९ किलो ३५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या धक्कादायक कारवाईत संबंधित दोन तस्करांना अटकेही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंजर पोलीस ठाण्याला गुप्त बातमी मिळाली होती की टिटवा गावातील तलावाजवळ काही जण नदीकाठी गांजाची विक्री करीत आहेत. ही बातमी मिळताच पोलिसांनी हालचाल सुरू केली. ३० मार्च रोजी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
छाप्याच्या वेळी दोघेजण गांजाची विक्री करताना रंगेहाथ पकडले गेले. संबंधित आरोपी संतोष गजानन कांबळे (वय २७) आणि डिंगाबर मारोती झिंगे हे टिटवाचेच रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ८ बंडलमध्ये बांधलेला १९ किलो ३५० ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला. हा जप्त केलेला गांजाची किंमत ३.८४ लाख रुपये आहे.
ही कार्यवाही ठाणेदार गंगाधर दराडे,यांंच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बंन्डु मेश्राम, राजपत्रित अधिकारी विनोद पाचपोहे, जनुना बिटचे जमादार नामदेव मोरे, राजुभाऊ वानखडे,रोशन पवार, पंकज ऐकाडे, नागेश दंदी, राजेश सावळे, नागेश ठाकरे,टिटवा येथील पोलिस पाटील पवन जाधव, होमगार्ड सैनिक ज्ञानेश्वर वेरूळकर, पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहे.
या धाडसी कारवाईमुळे गांजातस्करांच्या मनावर गदा बसली आहे. पिंजर परिसरात गांजाप्रकरणांवर पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.