अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २९ मार्च :-Akola Crime अकोला जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली दिवसेंदिवस वाढ लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्री. बच्चनसिंग यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शरद अशोक सहारे (३०, रा. खानापुर वेस, तालुका अकोट, जिल्हा अकोला) या आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीची कसून विचारपूस केल्यावर त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सहारेने साथीदारांच्या मदतीने अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील एकूण ५ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी Akola Crime अकोल्यातील पोलिस स्टेशन बोरगाव येथील गुन्ह्यातील हिरो कंपनीची सीबी शाईन मोटारसायकल किंमत ७० हजार रुपये, पोलिस स्टेशन मुर्तीजापूर शहरातील गुन्ह्यातील पॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल किंमत ४० हजार रुपये तसेच अमरावती ग्रामीण पोलिस स्टेशन पथ्रोट येथील गुन्ह्यातील ड्रीम युगा कंपनीची मोटारसायकल किंमत ६० हजार रुपये अशा एकूण १ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती पथकाने केली आहे. सहारेने अकोटफैल आणि अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यांतून चोरी केलेल्या मोटारसायकलीबाबतही कबुली दिली आहे.
या आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी जिल्ह्यातील अन्य चोरी गेलेल्या मोटारसायकलींचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक श्री. अभय डोंगरे आणि पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी बजावली आहे. याबाबत पुढील तपास सुरू असून लवकरच सायकल चोरट्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल अकोला पोलिसांचे अनेकांकडून कौतुक होत आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली अकोला स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात, पो.उप.नि राजेश जवरे, पोहेकॉ. उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेन्द्र मलीये, गोकुळ चव्हाण, नापोका. वसीमोददीन, पोकॉ. आकाश मानकर, अभीषेक पाठक व चालक अं. प्रशांत कमलकार तसेच सदर कार्यवाहीसाठी पो.स्टे. अकोट शहर येथील पो. उपनि. अख्तर शेख, पो. कॉ. मनिस कुलट, विशाल हिवरे, रवि सदांशिव, यांच्या सहकार्यामुळेच हा मोठा गौप्यस्फोट करता आला.