अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक २७ मार्च :- अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी जिल्ह्यात दामिनी पथकाला ॲक्टिव करताच Damini Pathak Action Mode टवाळखोर रोड रोमियोना पळता भुई कमी पडत असून महिलांना आता ग्रामीण भागात आपण सुरक्षित असल्याची जाणं होत आहे. असे असले तरी आपण देखील आपली स्वतः काळजी घेणे आणि आपला मुलगा किंवा मुलगी नेमकी करते तरी काय या कडे लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे आज ग्रामीण भागात सस्ती दिग्रस येथे झालेल्या कारवाईतून समोर आली आहे.
अकोला जिल्ह्यात दामिनी पथकाच्या कारवाया सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील टवाळखोर रोमियोंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत सस्ती दिग्रस आणि वाडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.
शाळेसमोरच विद्यार्थिनींची छेडछाड
दामिनी पथकाला सस्ती दिग्रस येथील एका शाळेसमोरून काही युवक विद्यार्थिनींची छेडछाड करत असल्याची माहिती मिळाली. मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून पथक घटनास्थळी पोहोचले आणि युवकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली.
वस्त्रहीन पळापळीचा प्रकार
वाडेगावमधील सोपीनाथ संस्थान परिसरातील निर्जन स्थळी दोन जोडप्यांना अश्लील चाळे करीत असल्याची माहिती देखील दामिनी पथकाला मिळाली. दामिनी पथकाला या जोडप्यांनी जवळ येताना पाहताच जोडप्यानी काढलेली आपली वस्त्रे हातात घेऊन दुचाकी घेऊन फरार झाले. हा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. असून ही ऐक लाजिरवाणी बाब असल्याचे बोलले जात आहे.
पालकांनाही बजावले इशारे
दामिनी पथक प्रमुख उज्वला इटीवाले यांनी पालकांना देखील इशारा दिला आहे. “आई-वडिलांनी मुलींकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर वेळोवेळी नजर ठेवावी. योग्य वयात मुलं भरकटून गेल्यास नंतर पश्चाताप होईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पोलिसांच्या या सक्रिय हालचालींमुळे ग्रामीण भागात महिलांची सुरक्षा वाढली असून रोड रोमियोंनाही यापुढे अशा कृत्यापासून दूर राहण्याची शिकवण मिळाली आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.