WhatsApp


जीवनदायी ठरणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला जीवदुचाकीला रुग्णवाहिकेची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अकोला जिल्ह्याच्या बाहेरील रस्ते अगदी गुळगुळीत झाले खरे पण हेच रस्ते आता आपल्या जीवावर उठले असून आता या रस्त्याने प्रवास करताना आपण सुखरूप घरी पोहोचू की नाही ही भीती प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. वेगावर नियंत्रण नाही आणि या कडे कोणाचेच लक्ष नाही वाहतूक विभाग आपल्या कामात व्यस्त आहे तर आर टी ओ कारवाया करण्यात मग्न आहे.

याचाच परिणाम वाहनाच्या वेगावर जाणवत असून आपल्यावर कोणाचीच नजर नसल्याने ही वाहने वाऱ्याच्या वेगाने जाऊन नागरिकांचा जीव घेत आहे. आज सायंकाळी अशीच एक घटना घडली असून या घटनेचं जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक देऊन दुचाकी चालकाचा जीव घेतला आहे.

  • आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेतातून घरी जातांना बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोधोरा मार्गावर असलेल्या हॉटेल माखनचोर जवळ रुग्णवाहिका चालकाने दुचाकीला उडवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला शहराच्या काही अंतरावर असलेल्या रिधोरा गावाजवळ असलेल्या हॉटेल माखनचोर जवळील शेतातून घरी परतणाऱ्या राजेश डोईफोडे यांना मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली.

या घटनेत राजेश डोईफोडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर रुग्णवाहिका ही ओझोन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची असल्याचे माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिका चालकाकडे परवाना नसल्यामुळे तो दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालवत असल्याचे समोर आल्याने लोकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

चूक रुग्णवाहिका चालकाची तर आहेच पण अकोल्यातील ओझोन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या कर्मचारी तसेच येथील डॉक्टर यांच्या देखील कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून रुग्णवाहिका चालकाजवळ लायसन नसून देखील त्याला रुग्णवाहिका चालवायची परवानगी नेमकी दिली कोणी? नेमका हा रुग्णवाहिका चालक दारूच्या नशेत असताना त्याला या रुग्णवाहिकेची चाबी दिली कोणी? या सह असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिका चालक दारूच्या नशेत होता आणि त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता. स्थानिकांनी रुग्णवाहिका चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

या प्रकरणात ओझोन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत हा रुग्णवाहिका चालक कोणाच्या आदेशाने कार्यरत होता व त्याला रुग्णवाहिकेची चावी कोणी दिली होती, अशा प्रश्नांना उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!