अकोला महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजप उमेदवारांना मिळणारा झंझावाती प्रतिसाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गल्लीपासून चौकापर्यंत, घराघरातील भेटींपासून बैठका आणि संवाद सभांपर्यंत नागरिकांचा स्पष्ट कौल भाजपच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
प्रचाराच्या मैदानात उतरलेले भाजप उमेदवार केवळ आश्वासनांवर नव्हे, तर आतापर्यंत झालेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देत भाजप उमेदवारांनी विश्वास संपादन केल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, “काम बोलतंय” या भूमिकेवर ठाम राहत भाजपकडून कोणताही आरोप-प्रत्यारोप न करता सकारात्मक प्रचार केला जात आहे. याचाच परिणाम म्हणून प्रभाग १३ मध्ये भाजपच्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत असून, नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “फक्त निवडणुकीपुरते चेहरे नकोत, तर वर्षभर दिसणारे, काम करणारे प्रतिनिधी हवेत.” हा सूर भाजपच्या बाजूने जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रभाग क्रमांक १३ हा अकोला मनपा निवडणुकीतील हॉटसीट ठरण्याची शक्यता वाढत आहे. झंझावाती प्रतिसादामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत आहे.
आता अंतिम निकाल काय लागतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





