राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कोण किती जागांवर लढणार, कोण कुणासोबत जाणार, यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी कालपर्यंत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नेते आज एकाच टेबलावर बसताना दिसत आहेत. मुंबई आणि पुण्यानंतर आता विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये ‘महायुती’ एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
काल येथे पार पडलेल्या बैठकीत आणि (शिंदे गट) यांनी स्पष्ट भूमिका घेतली. याच बैठकीत लाही सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे विदर्भातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, महानगरपालिकेतील महायुतीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला समोर आला असून, तो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. २०१७ च्या निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या होत्या आणि सध्या ज्या तिन्ही पक्षांच्या ताब्यात आहेत, त्या जागा पुन्हा त्याच पक्षांकडे ठेवण्यावर प्राथमिक सहमती झाल्याची माहिती आहे.
२०१७ मध्ये अकोला महापालिकेतील एकूण ८० जागांपैकी ४८ जागा भाजपकडे, ८ जागा शिवसेनेकडे आणि ५ जागा राष्ट्रवादीकडे होत्या. म्हणजेच तिन्ही पक्षांच्या ताब्यात एकूण ६१ जागा होत्या. त्यामुळे उर्वरित १९ जागांचे नव्याने वाटप करण्याचा फॉर्म्युला चर्चेत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या उर्वरित जागांपैकी ७ ते ८ जागा शिंदे शिवसेनेला, ५ ते ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ जागांवर, शिंदे शिवसेना १५ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर निवडणूक लढवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे, अकोल्यातील अंतिम जागावाटप उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीत नेमका कोणता पक्ष किती ताकदीने मैदानात उतरणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
एकूणच, अकोला महापालिकेच्या रणांगणात महायुतीचं राजकीय गणित जवळपास ठरलेलं असून, विरोधकांसमोर आता मोठं आव्हान उभं ठाकणार असल्याचं चित्र आहे. आता प्रश्न एकच—हा फॉर्म्युला मतदारांच्या पसंतीस उतरणार का? त्याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.





