अकोला जिल्ह्यातील तालुक्यात गोवंश चोरीच्या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे अप. नं. ५६०/२०२५, कलम ३०३ (२) बी.एन.एस. अन्वये दोन गायी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अंदाजे ₹४५,००० किमतीचा गोवंश मुददेमाल चोरीस गेला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून चोरी गेलेल्या गायी आणि आरोपीचा शोध सुरू होता. मात्र दीर्घकाळ कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर संशयित बबलु ईनामदार याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुखबीर नेमण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी, नातेवाईकांकडे चौकशी आणि संभाव्य ठिकाणी वारंवार शोधमोहीम राबवण्यात आली.

दरम्यान, २५ डिसेंबर २०२५ रोजी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत येथे कारवाई केली. या कारवाईत गुलाम शाहीद गुलाम राजीक उर्फ बबलु ईनामदार, रा. धारोळी वेस, अकोट याला अतिशय शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेल्या दोन गायी आपल्या घराशेजारील गोठ्यात लपवून ठेवल्याचे सांगितले.
यानुसार पोलिसांनी नमूद गोवंश हस्तगत करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे.
ही कारवाई यांच्या आदेशान्वये, यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई यशस्वी ठरली.
या कारवाईमुळे गोवंश चोरीविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली असून, परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.





