अकोला जिल्ह्यातील तालुक्यात गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अकोट ग्रामीण पोलिसांनी सतर्कतेने मोठी कारवाई केली आहे. अंजनगाव–अकोट मार्गावर कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेले जात असलेले दोन गोवंश जनावरे वाचवण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात एक आरोपी अटकेत आहे.
दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला हजर असताना गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अंजनगावकडून अकोटकडे गोवंशाची तस्करी सुरू असल्याचे समजले. माहितीची दखल घेत पोलिसांनी परिसरात तातडीने नाकाबंदी केली.
सकाळी ७.३० ते ८.०० वाजेदरम्यान संशयित टाटा एसीई वाहन अडवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. वाहनाच्या मागील भागात दोन गोवंश जनावरे बांधलेली आढळून आली. चालकाकडे गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक परवाने मागितले असता, कोणताही वैध पास नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही वाहतूक अवैधरित्या कत्तलीसाठी होत असल्याची खात्री पोलिसांना पटली.

चौकशीत आरोपीने आपले नाव सै. अशपाक सै. मुश्ताक (वय ३७), रा. नवगाजी प्लॉट, अकोट असे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टाटा एसीई वाहन (अंदाजे ₹२ लाख) आणि दोन गोवंश (अंदाजे ₹३० हजार) असा एकूण ₹२.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई यांच्या आदेशान्वये, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
अकोट ग्रामीण पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे गोवंश तस्करीविरोधात प्रशासनाची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची दक्षता वाढवण्यात आली आहे.






