मेहकर तालुक्यातील येथे सासरच्या जाचाला कंटाळून २१ वर्षीय गर्भवती विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा रोखठोक पवित्रा माहेरच्या नातेवाईकांनी घेतला होता.
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव साधना विष्णू चोडकर (वय २१) असे असून तिचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. ही घटना हद्दीत घडली. माळेगावचे पोलीस पाटील यांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत महिलेने उडी घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मृतक महिलेचे माहेर (जि. वाशिम) येथे असून, नातेवाईक तातडीने माळेगावात दाखल झाले. “मुलीला सासरच्या लोकांचा सातत्याने त्रास दिला जात होता. या जाचाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली,” असा आरोप करत सासू, सासरे आणि पती यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली, तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला मोबाईल लोकेशनच्या आधारे येथून अटक करण्यात आली. त्यानंतर व्हिडीओ कॉलद्वारे अटक झाल्याची खातरजमा नातेवाईकांना करून देण्यात आली. यानंतरच माहेरच्या मंडळींनी मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मृतदेह मेहकर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपींना अटक झाल्यानंतर परिसरातील तणाव निवळला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





