WhatsApp

नागपुरात कोळी समाजाचा महासागर; जात प्रमाणपत्रासाठी हिवाळी अधिवेशनात जोरदार हुंकार

Share

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दहा डिसेंबरला कोळी महादेव, टोकर कोळी, कोळी मल्हार, कोळी डोंगर, कोळी ढोर आदी जमातींनी महामोर्चा काढत शहराला अक्षरशः ठप्प केले. सकाळपासूनच नागपूरमध्ये समाजबांधवांची मोठी गर्दी उसळली होती. विविध जिल्ह्यांतून, उपविभागांतून आणि गावागावांतून आलेल्या नागरिकांनी मोर्चात सहभागी होत शासनाचे लक्ष वेधण्याचा ठाम प्रयत्न केला.



मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली. हर हर महादेवचा जयघोष, शासनाच्या धोरणांविरोधातील आवाज आणि जात विषयक तक्रारी यामुळे परिसर दणाणून गेला. समाजाची मुख्य मागणी एकच होती. कोळी समाजाला तत्काळ जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करून देण्यात यावी. अनेक वर्षांपासून कागदपत्रांच्या अडचणीमुळे शिक्षण, नोकरी आणि विविध योजनांमधील संधी हुकत असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.

मोर्च्यात मोठ्या संख्येने तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. नागपूर पोलिसांनी बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रित ठेवल्याचे दिसले.

मोर्चाची दखल घेत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाज प्रतिनिधींशी चर्चा केली. येत्या शनिवारी पालकमंत्री, महसूल मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत अधिकृत चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे समाजामध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे.

Watch Ad

कोळी समाजाच्या या मोठ्या आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे समोर येण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही समाजनेत्यांनी दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!