अकोट ग्रामीण पोलिसांनी अंजनगाव रोडवरील पठार नाल्यासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोउपनि मिनाक्षी काटोले मॅडम यांनी पथकासह तपास केला असता, चार इसम ‘तीन पानी परेल’ नावाचा जुगार पैशाच्या हारजीतवर खेळताना पकडले गेले.
दौऱ्यादरम्यान मिळालेल्या खात्रीलायक माहितीवर तात्काळ पंच उपस्थित करून सापळा रचण्यात आला. पठार नाल्याच्या परिसरात चारजण ५२ ताश पत्त्यांवर पैशाचा खेळ खेळताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत विचारणा केली असता त्यांनी आपली नावे अशी सांगितली:
१) नदीम खॉ मुस्ताक खॉ (वय ३७, रा. इफतेखार प्लॉट, अकोट)
२) शाम मोहनलाल ठाकुर (वय ४५, रा. गवळीपुरा, अकोट)
३) विष्णु प्रल्हाद कायवाटे (वय २५, रा. ढोरपुरा, अकोट)
४) आशिष ब्रिजमोहन शर्मा (वय ५२, रा. विजय टॉकीजजवळ, अकोट)
या सर्व आरोपींच्या अंगझडतीत एकूण १३ हजार १७० रुपये रोख, ५२ ताश पत्ते आणि एमएच 30 AS 4367 ही मोटरसायकल अंदाजे ५५ हजार रुपये किंमतीची मिळाली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६८ हजार १७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण मालमत्ता पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी आणि सहा. पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि मिनाक्षी काटोले, पो.हे.कॉ. विठ्ठल चव्हाण, पोकॉ शैलेश जाधव, पोकॉ शुभम लुंगे, पो.कॉ. राजेश माळेकर, पो.कॉ. सुनिल पाटील सहभागी होते.
या कारवाईने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. स्थानिकांचा आरोप आहे की पठार नाल्याजवळ रात्रीच्या वेळी जुगाराचे अड्डे सुरू असतात आणि बाहेरगावचे इसम येथे येऊन पैशांची उधळण करतात. पोलिसांची वेळेवर कारवाई झाल्याने अनैतिक व्यवहारावर आळा घालण्यात यश मिळाले.
पोलिसांकडून माहिती मिळाली असून पुढील चौकशी सुरू आहे. अधिकारी सांगतात, “सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे गुन्हा आहे. अशा प्रकारच्या अड्ड्यांवर सतत लक्ष ठेवले जाईल. नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.”
या कारवाईनंतर परिसरात कडक संदेश गेला आहे की, अनधिकृत जुगारावर आता पोलिसांचा सापळा कायम सक्रिय राहणार आहे.




