WhatsApp

आजचे राशिभविष्य 30 ऑक्टोबर 2025 : मेषने खर्च सांभाळा, मकरची डिल फायनल! तुमचा दिवस कसा?

Share

Aaj che Rashibhavishya 30 October 2025 : आज गुरुवार, दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभेल. सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा. मेषला नोकरीत यश, कर्कची थांबलेली कामे पूर्ण होतील. सिंहला अडचणी, वृश्चिकला धावपळ. मकरची डील फायनल होऊन आर्थिक फायदा, कुंभला धनलाभ, मीनला प्रवास. मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा ते जाणून घ्या.



मेष – खर्चावर नियंत्रण ठेवा

नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असून तुम्ही नोकरीसाठी केलेले प्रयत्न फळाला येतील आणि योग्य संधी मिळेल. मात्र, उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात आर्थिक संकट येवू शकते. नवीन नोकरी किंवा कामाचा विचार करत असाल, तर ती संधी मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी जोडीदाराची ओळख कुटुंबियांना करून द्यावी.



वृषभ – व्यापारातील नवीन योजनेत यश

व्यापाराशी संबंधित नवीन योजना आखत असाल तर आज ती यशस्वीपणे पूर्ण होईल आणि चांगला लाभ मिळेल. एखादा जुना मित्र आज मदतीसाठी पुढे येईल. मात्र, रोजच्या धावपळीत तब्येतीकडे दुर्लक्ष कू नका. थोडीशीही तब्येतीची तक्रार वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक व्यवसायात आज मुलांची मदत मिळेल त्यामुळे चांगला फायदा होईल. प्रत्येक कामात जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.


मिथुन – छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा

आर्थिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. ऑफिसमध्ये काही सहकाऱ्यांसोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण त्यात मनावर घेण्यासारखे काही नाही. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. आप्तेष्ट- नातेवाईट यांची मदत होईल. ते तुम्हाला उत्तम साथ देतील. जर तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवसअनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणी जाणवू शकतात. सासरच्या मंडळींपैकी एखाद्याशी थोडा वाद होण्याची शक्यता आहे.




कर्क – थांबलेले काम पूर्ण होणार

आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो, पण तुमच्या बुध्दीमत्तेने आणि विनम्र वाणीनं तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकाल. नोकरी किंवा व्यवसायातील कामात भावाची मदत उपयोगी ठरेल. आज आईकडून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. संध्याकाळी जोडीदारासाठी एखादे सुंदर भेटवस्तू घेऊन जाणार आहात.


सिंह -नोकरी- व्यवसायात समस्या
तुम्ही एखाद्या जुन्या मित्रामुळे विनाकारण वादात अडकू शकता. जर तुम्ही दूरच्या प्रवासाची योजना आखत असाल तर ती यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि विश्वास आणखी दृढ होईल. संध्याकाळी वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे टेन्शन वाढेल. तब्येतीची विशेष काळजी घ्या. भावंडांशी नातेसंबंध अधिक मधूर होतील. शेजाऱ्यांसोबत कोणताही वाद झाला तर त्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल.


कन्या – मिळकतीचे नवीन मार्ग खुले होणार

आज तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल मात्र, शत्रूंची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील, पण तब्येतीबद्दल सावध राहा, अन्यथा मानसिक तणाव वाढू शकतो. राजकारणाच्या क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पूर्ण सहयोग मिळेल. मुलांनी केलेल्या कार्यामुळे मन आनंदित होईल.



तुळ – भेटवस्तू मिळणा, कामात बदल होणार

कामाच्या क्षेत्रात बदल करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल ज्यामुळे मन प्रसन्न होईल. विरोधक सक्रिय होतील, पण ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी वस्तू भेट म्हणून मिळू शकते.


वृश्चिक – व्यवसायात धावपळ सावध राहा

तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल त्यामुळे जे काम हाती घेणार त्यात यश आहे. कुटुंबात एखादे मंगलकार्य होऊ शकते ज्यावर थोडा खर्च होईल. एखादी प्रलंबित व्यावसायिक योजना आज पुढे सरकेल. सासरच्या मंडळींकडून सन्मान मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात आज थोडी धावपळ होऊ शकते. मुलांच्या विवाहासंबंधी निर्णय घ्यायचा असल्यास घाई करू नका.


धनु – कुटुंबात वादाची शक्यता

विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील जुन्या वादांचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो, परंतु आई-वडिलांच्या सल्ल्याने तो सोडवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. ऑफिसमध्ये काही सहकारी तुमच्यासाठी पार्टीचे आयोजन करू शकतात. व्यवसायाची गती वाढवण्यासाठी तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.


मकर – व्यवसायात थांबलेली डिल होणार

आजचा दिवस कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी अत्यंत यशस्वी ठरेल. दुपारी व्यापाराशी संबंधित एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते ज्यासाठी थोडा प्रवास करावा लागू शकतो. भागीदारीत एखादी प्रलंबित डील पूर्ण होण्याची शक्यता आहे, जी भविष्यात मोठा फायदा देईल. मात्र, पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. सासरच्या बाजूने आलेल्या अडचणी आज जोडीदाराच्या मदतीने दूर होतील.


कुंभ – धनलाभासह कामात यश

तुम्ही मुलांसंदर्भातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. कला किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी दिवस व्यस्त असेल पण संध्याकाळी थकवा जाणवेल. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने अचानक धनलाभ होऊ शकतो, पण उत्पन्न-खर्च यामध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. घरातील लहान मुले तुमच्याकडे काही मागणी करतील. नोकरी किंवा व्यवसायात वादाची स्थिती निर्माण झाली तर रागावर नियंत्रण ठेवा.


मीन – व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल

तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. पार्ट-टाइम कामाचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ मिळेल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने संपत्तीविषयक लाभ होणार आहे. व्यवसायासाठी प्रवासही घडेल. मात्र, वडिलांचा डोळ्यांचा आजार पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे काळजी घ्या. समाजकार्यात सहभागी झाल्याने मन आनंदित असेल.



Watch Ad

Leave a Comment

error: Content is protected !!