WhatsApp

Horoscope Today 26 Oct 2025: ‘या’ 7 राशींचा भाग्यदिन! श्रीखंडोबाची कृपा, पाहा, तुमचे राशिभविष्य

Share

Horoscope Today 26 October 2025: वैदिक पंचांगानुसार आज रविवार, 26 ऑक्टोबर 2025. आजचा दिवस ज्योतिषदृष्ट्या खास असून सर्व राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. ग्रहांचा दुर्लभ संयोग होत असून त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचा दिवस उजळणार? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत तुमचा दिवस कसा असेल ते सविस्तरपणे पाहूया.





मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज भावंडांशी न पटल्यामुळे ताणतणाव वाढतील, कामांमध्ये नाकापेक्षा मोठी जड होता उपयोगाचा नाही


वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला शुल्लक कारणावरून चिडचिड करतील, परंतु तुमच्या कामाची शिस्त आणि धडाडी वाखाणण्याजोगी असेल


मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर असतील, त्याप्रमाणे नियोजनही कराल


कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज अहंकारामुळे स्वतःहून कोणाकडेही कसली याचना करणार नाही, कुटुंबामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल


सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कोणतीही परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी यशाला खेचून आणाल. कडक बोलणे टाळा


कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज घरातील धार्मिक कार्यात भाग घ्यावा लागल्यामुळे जास्त काम पडेल, स्वतःला इतरांपेक्षा हटके समजण्यात धन्यता मानाल


तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल, कामाचे नियोजन केलेत तर काम व्यवस्थित पार पडेल


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करून घ्याल, खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल


धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंत स्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल.

Watch Ad


मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल, पुढील गोष्टींचे अंतः स्फूर्ती जाणवेल


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या कर्तुत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील, महिलांमधील स्त्री सुलभ कोमलता आणि प्रेमळपणा जास्त जाणवेल


मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कामाची उत्तम अंमलबजावणी कराल आणि यशस्वी व्हाल, एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल

https://www.instagram.com/reel/DQPVi95jenJ/?igsh=MXg3Zmg3YzZwNXoyeA==


Leave a Comment

error: Content is protected !!