WhatsApp

बलात्कार, अपहरण व पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला मिळाली जामीन मंजुरी

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १६ ऑक्टोबर २०२५: अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी अकोट (शहर) पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सौरभ संतोष गणेशकर याच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १३७ (२), ६४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३१९/२०२५ नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला पोलीसांनी अटक केली होती.त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲड विक्की प्रमोद कोथळकर आणि ॲड विशाल भिवरकर यांनी वि. जिल्हा व सत्र न्यायालय अकोट येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान दोन्ही अधिवक्त्यांनी प्रभावी आणि कायदेशीर युक्तिवाद मांडला.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून वि. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. बी. एम. पाटील यांनी आरोपी सौरभ संतोष गणेशकर याला जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.



Leave a Comment

error: Content is protected !!