अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक – १३ ऑक्टोबर २०२५: पंचायत समिती अकोटच्या निर्वाचक गण आरक्षण सोडत कार्यक्रमाचा समारंभ आज (१३ ऑक्टोबर २०२५) तहसील कार्यालय अकोट येथे जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार पार पडला. पंचायत समिती निवडणुकीपूर्वीचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.या सोडतीसाठी डॉ. सुनील बाबुराव चव्हाण, तहसीलदार अकोट यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून तर श्री. मनोज रमेश लोणारकर, उपविभागीय अधिकारी अकोट यांनी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून हजेरी लावली. निवडणूक नाय तहसीलदार सुभाष सावंत हेही या कार्यक्रमात उपस्थित होते.
सोडती पारदर्शकतेने पार पडली
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्णतः पारदर्शक आणि शांततेत पार पडला. या सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ईश्वरचिट्ठी काढण्याचा सन्मान कुमारी सिया सिद्धांत वानखडे हिला देण्यात आला. उपस्थितांनी या बालिकेचा गौरव टाळ्यांच्या गजरात केला. तिच्या हस्ते झालेल्या ईश्वरचिट्ठीच्या प्रक्रियेनंतर प्रत्येक गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.या कार्यक्रमाला अकोट तालुक्यातील सर्व इच्छुक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. निवडणुकीपूर्वीचा हा टप्पा शांततेत आणि नियमबद्धतेने पार पडल्याबद्दल प्रशासनाच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
पंचायत समिती अकोट निर्वाचक गण आरक्षण यादी

आरक्षण सोडतीनुसार पंचायत समिती अकोटच्या गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे –
उमरा (१५) – नामनिर्देशित (ना.मा.प्र.)
कासोद-शिवपूर (१६) – सर्वसाधारण महिला
अकोळखेड (१९) – नामनिर्देशित महिला
मोहोळ (१८) – अनुसूचित जमाती
अकोली जहांगिर (२०) – सर्वसाधारण
पणज (२१) – सर्वसाधारण
आसेगाव बाजार (१९) – अनुसूचित जाती महिला
वडळी देशमुख (२२) – सर्वसाधारण
मुडगाव (२३) – सर्वसाधारण महिला
अडगाव खु. (२४) – अनुसूचित जाती महिला
वरुळ (२५) – अनुसूचित जाती
देवरी (२६) – नामनिर्देशित
कुटासा (२७) – सर्वसाधारण महिलारे
रेल (२८) – अनुसूचित जमाती महिला
चोहोट्टा (२९) – नामनिर्देशित महिला
केळीवेळी (३०) – सर्वसाधारण
या आरक्षणानुसार प्रत्येक गटाचे प्रतिनिधित्व निश्चित झाले असून महिलांसाठी तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव गट वाढले आहेत.राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि माजी सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
निवडणुकीच्या तयारीला वेग
या सोडतीनंतर आता अकोट तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणत्या सर्कलला आरक्षण मिळाले यानुसार आता विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे ठरवतील. काही गटांमध्ये आरक्षण बदलल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.गावागावात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात झाली असून, उमेदवारांची नावं कोणत्या गटात निश्चित होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकोट पंचायत समिती आरक्षण सोडत हा कार्यक्रम प्रशासनाच्या नियोजनक्षमतेचा आणि पारदर्शकतेचा उत्तम नमुना ठरला आहे. आता या निकालानंतर तालुक्यात लोकशाहीच्या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुका अधिक चुरशीच्या आणि रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.