WhatsApp


ग्रामीण पत्रकार संघाची अकोट तालुका कार्यकारिणी गठीत उपाध्यक्षपदी गणेश बुटे आणि दिपक दाभाडे यांची निवड…

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १२ मार्च २०२४ :- ग्रामीण पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्यलय नागास्वामी प्रींटर्स येथे दि.10 फेब्रुवारी ला बैठक संपन्न झाली.यावेळी तालुकाध्यक्ष नरेद्र कोंडे यांनी वरिष्ठांशी बोलुन उर्वरित तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.त्यामध्ये उपाध्यक्ष पदी दिपक दाभाडे, गणेश बुटे, सहसचिव दत्तात्रय भगत, कोषाध्यक्ष,शरद भेंडे, सहकोषाध्यक्ष अतुल डाफे,संघटक वैभव गुजरकर,सहसंघटक अभिजीत सोळंके,सल्लागार गोवर्धन चव्हाण, साधुबुवा खोटरे,धनु बायवार सरचिटणीस,पुर्णाजी खोडके प्रसिद्ध प्रमुख, काशिनाथ कोंडे कार्यालय प्रमुख तर सदस्यपदी प्रमोद सावरकर,

अश्विन पागृत,विलास नवले, तुषार सावरकर,विष्णु तेल्हारकर,युवराज मंगळे, शिरीष महाले,शरद वालसिंगे, आदींचा समावेश करण्यात आला.बैठकीला राज्य सचिव राजेशजी डांगटे,प्रदेश प्रवक्ते अनंतराव गावंडे हे प्रमुख पाहुणे तर अमरावती विभागीय उपाध्यक्ष अहेमद शेख,जिल्हा सचीव संतोषजी ताकोते,जिल्हा उपाध्यक्ष,मनोहरराव गोलाईत,कमलेशजी राठी, निरंजनजी गावंडे,जिल्हा सदस्य प्रकाश आम्ले,जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठलराव गुजरकर ,गोवर्धनजी चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन नरेंद्र कोंडे, प्रास्ताविक गोवर्धन चव्हाण,तर आभार प्रदर्शन सचीव देवांनंद आग्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे,कार्याध्यक्ष अरुण काकड, सचीव देवांनंद आग्रे यांनी केले.यावेळी पत्रकार संघाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थीत होते.

Leave a Comment

error: Content is protected !!