WhatsApp


भारतात लवकरच येणार पहिली CNG बाईक! बजाज प्लॅटिना 110 CNG लवकरच लाँच होणार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो :- CNG बाईक तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आणि पाहिले आहे. पण आता लवकरच भारतीय बाजारात CNG वर चालणारी बाईक येणार असून देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी बजाज लवकरच भारतातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. हे बजाज प्लॅटिना 110 मॉडेल असेल..

बाईक कधी लॉन्च होणार?
कंपनीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ही बाईक लॉन्च केली जाईल. या बाईकची किंमत सुमारे 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. दरम्यान, या बाईकचे मायलेज सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅटिनापेक्षा (75-90km/l) जास्त असेल.

अशी असेल CNG बाईक?
ही सीएनजी बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅटिनासारखीच असेल. फक्त, यात इंधन टाकीऐवजी सीएनजी सिलिंडर मिळेल. असे म्हटले जात आहे की, बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी असू शकते, जी बाईकचे CNG रिकामे झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही बाईक सीएनजी आणि पेट्रोल, या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिंग लाइट्सही मिळू शकतात. बाकी इंजिनची पॉवर आणि इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच मिळतील.

या सीएनजी मोटरसायकलमध्ये लांब सीट्स, फ्लॅट सीएनजी सिलेंडर, इंधन टाकीवर मोठे पॅनेल गॅप असेल, जिथून सीएनजी टाकीचा व्हॉल्व्ह उघडता येईल. बाईकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी देखील उपलब्ध असेल, जी बाईकचा CNG सिलेंडर रिकामी झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही मोटरसायकल सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही पर्यायांमध्ये चालणार आहे. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिंग लाइट्सही मिळू शकतात.

सध्या, बजाज प्लॅटिना 110 च्या पेट्रोल मॉडेलची किंमत 70,400 रुपयांपासून सुरू होते आणि 78,821 रुपयांपर्यंत जाते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. हे दोन प्रकार आणि 6 रंग पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याचे 115cc इंजिन 8.60 PS ची पॉवर आणि 9.81 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याचे मायलेज 70 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!