अकोला महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा – 2025’ अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अभियानाची आजपासून भव्य सुरुवात झाली. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोनमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण निर्मितीचा संदेश देण्यात आला.
शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” उपक्रम राबवण्यिात येत आहे. या अनुषंगाने दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी अकोला महानगरपालिकेच्या पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सदर अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.
ज्यामध्ये पुर्व झोन अंतर्गत झोन कार्यालय येथे माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुनिताताई अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे शुभारंभ करून झोन कार्यालय परिसरातील सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त राजेश सरप, प्र.स.राजेश सोनाग्रे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि झोन कार्यालयातील कर्मचा-यांचा समावेश होता.
तसेच पश्चिम झोन अंतर्गत झोन कार्यालय येथे माजी महापौर विजय अग्रवाल, सुमनताई गावंडे, माजी उपमहापौर वैशालीताई शेळके, राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक अनिल गरड, सतीष ढगे, सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, किशोर मांगटे पाटील, रमेश अलकरी, देवाशिष काकड, नितीन ताकवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे शुभारंभ करून शिवचरण पेठ येथील भाजी बाजार परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहा. दिलीप जाधव, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अमर खोडे यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि झोन कार्यालयातील कर्मचा-यांचा समावेश होता.
तसेच उत्तर झोन अंतर्गत आकोट फैल येथील कचा-याचे ठिकाणांची कचरा उचलून स्वच्छता करून अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रौशन आली यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि झोन कार्यालयातील कर्मचा-यांचा समावेश होता.
तसेच दक्षिण झोन अंतर्गत झोन कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करून अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त देविदास निकाळजे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सुनिल खेते यांचेसह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि झोन कार्यालयातील कर्मचा-यांचा समावेश होता.
मनपा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून स्वच्छ, निरोगी आणि सुंदर अकोला घडविण्यात हातभार लावावा.