Finance Horoscope Today 17 September 2025 : आपल्या मनासारखं मिळालं नाही म्हणून परमेश्वरावर नाराज होवू नका कारण तो तुम्हाला तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. आज बुधवार असून वृषभसह या राशींसाठी दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची साथ, आत्मविश्वास द्विगुणीत होईल. मिथुनसह या राशीचे खूप खर्च होत आहेत त्यांनी अनावश्यक खर्च कमी करावेत. कुंभसह या राशीने प्रत्येक काम करताना सावध राहावे. चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते सविस्तरपणे पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य – कर्ज घेणे टाळावेआज तुमचा सरकारकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. पण आज जर तुम्ही एखादी व्यक्ती, बँक, किंवा संस्थेकडून कर्ज घेणार असाल तर ते घेऊ नका. आज घेतलेल्या कर्जाची परतफेड कठीण होईल. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल आणि चांगल्या मित्रांची संख्या वाढेल. आज पत्नीच्या बाजूने सहकार्य मिळेल. रात्रीचा वेळ आनंदात जाईल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य – थांबलेले काम पूर्ण होणारआजच्या दिवशी तुम्ही कामात फार व्यस्त असाल. जास्त धावपळ होणार नाही, असे पाहा. पायाला मार लागण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला आज लाभ होईल. रखडलेली कामे आज मार्गी लागतील. एखाद्या कामात गुंतवणूक करावी लागली तर आवश्य करा, पुढे त्याचा फायदा होईल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य – सामाजिक कामात समस्याआज वायफळ खर्चापासून दूर राहा. जर तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असेल तर हा त्रास आज वाढू शकतो. सामाजिक कार्यात काही अडचणी येऊ शकतात. काही आकस्मिक लाभ होतील, त्यामुळे धर्म, आध्यात्म यात तुमची रुची वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. सायंकाळी गायन किंवा वाद्यसंगीताच्या मैफिलीत सहभागी व्हाल.
कर्क आर्थिक राशिभविष्य – मेहनतीचे फळ मिळेलभाग्याच्या दृष्टीने विचार केला तर आजचा दिवस उत्तम जाईल. तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. मुलांप्रती तुमचा विश्वास मजबूत होईल. आज आईच्या माहेरकडून विशेष प्रेम आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा मानसन्मान, प्रतिष्ठा यावर खर्च कराल त्यामुळे तुमच्या शत्रूला त्रास होईल. आई-वडिलांकडे विशेष लक्ष द्या, त्यातून तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळतील.
सिंह आर्थिक राशिभविष्य – वाणीवर कंट्रोल ठेवाआजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. मानसिक अशांती, खिन्नता आणि उदासीनता यामुळे तुम्ही भटकू शकता. आई वडिलांच्या सहकार्याने दिवसाच्या उत्तरार्धात दिलासा मिळेल. सासरचे लोक तुमच्याबद्दल नाराज असल्याचे संकेत मिळतील. तुम्ही आत तुमची भाषा मधुर ठेवा अन्यथा नात्यांत कटुता येऊ शकते. डोळ्यांशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यात सुधारणा होईल.
कन्या आर्थिक राशिभविष्य – कठिण काम पूर्ण करणारआज तुम्ही निर्भिडपणे आणि धाडसाने कठीण कामे पूर्ण करण्यात सक्षम राहाल. तुम्हाला आईवडिलांचे सुख मिळेल. पत्नीला काही शारीरिक त्रास होईल, त्यामुळे तुम्ही खिन्न असाल. अनावश्यक खर्च होण्याचा योग आहेत. तुम्ही लोकांच्या भल्याचा विचार कराल पण लोकांना मात्र तो तुमता स्वार्थ वाटेल. व्यापारात धनलाभ होईल.
तूळ आर्थिक राशिभविष्य – कामामधील गुंतवणूक लाभदायकआजचा दिवस तुमच्यासाठी शुभकारक राहील. तुमच्या अधिकार आणि संपत्तीत वृद्धी होईल. तुम्ही आज इतरांच्या कल्याणाचा विचार कराल आणि मनापासून सेवाही कराल. आज गुरूंप्रती पूर्ण भक्तिभाव आणि निष्ठा असेल तसेच तुम्ही दानधर्म कराल. आज नवीन कामात गुंतवणूक केली तर ते शुभ राहील.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – विरोधकांवर मात करणारआज तुमचे मन अशांत आणि त्रस्त असेल. व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी होतील. सायंकाळपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिभेने आणि संयमाने शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. जर एखादा वाद सरकारी पातळीवर प्रलंबित असेल तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
धनू आर्थिक राशिभविष्य – आर्थिक स्थिती उत्तमआज तुमची विद्या, ज्ञान यात वृद्धी होईल. आज तुमच्या दानधर्म, पूण्य, परोपकरा या भावना विकसित होतील. तसेच तुम्ही आज धार्मिक अनुष्ठानात विशेष रुची घेणार आहात. आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती सुदृढ होईल. सायंकाळापासून ते रात्रीपर्यंत पोटाचे काही विकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहावे आणि खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
मकर आर्थिक राशिभविष्य – अनावश्यक खर्च कमी कराआज तुम्हाला बहुमूल्य वस्तूंची प्राप्ती होईल, पण अनावश्यक खर्च होतील. हे खर्च तुम्हाला मनात नसतानाही करावे लागतील. सासरच्या बाजूने मान, सन्मान मिळेल. व्यवसायात मन लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या नवीन कामात गुंतवणूक करावी लागली तर करावी, याचा भविष्यात लाभ होईल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य – विश्वासघाताची शक्यता, सावध राहाआजच्या दिवशी तुम्ही विवेकबुद्धीने एखादा नवीन शोध घेण्याचा प्रयत्न कराल. आज खर्च मात्र आवश्यकतेनुसार आणि मर्यादेत कराल. नातेवाईकांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखभोग आणि नोकरचाकर यांचे सुख मिळेल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत एखादा जवळचा प्रवास होईल. हा प्रवास लाभकारक ठरेल.
मीन आर्थिक राशिभविष्य – आर्थिक नुकसान, वादविवादाची शक्यताआज मोठ्या मुलासोबत वाद तसेच आर्थिक नुकसान होणार आहे. काम करताना सतर्क राहा. तुमचा स्वभाव आनंदी आहे, त्यामुळे इतर लोक तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक सन्मान मिळाल्याने मनोबल वाढेल. नातवंड काही कारणामुळे आजारी पडतील त्यामुळे तुमचे टेन्शन वाढणार आहे. कामात फोकस ठेवा अन्यथा जे करत आहात ते बिघडण्याची शक्यता आहे.