WhatsApp

जंक्शनवर भयंकर अपघात, प्रवासी गाडीखाली अडकला, गॅस कटरने सुटका; गाडी तब्बल दीड तास ठप्प

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो संतोष माने प्रतिनिधी मूर्तिजापूर (अकोला) दिनांक 15 सप्टेंबर :- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला हादरवणारी एक धक्कादायक घटना आज 15 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर घडली. पुणे–अमरावती या गाडीतून मयतासाठी आलेल्या कुटुंबासोबत प्रवास करणारा अकोल्यातील मुस्ताक खान मोईन खान हा प्रवासी दुपारी पावणे चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरतानाच घसरला आणि थेट गाडीच्या खाली अडकला.



घटनास्थळी क्षणभरातच भीषण परिस्थिती निर्माण झाली. जखमी प्रवासी एवढा घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्यप्राय ठरत होते. तत्काळ रेल्वे पोलिसांनी जय गजानन आपत्कालीन पथकाला पाचारण केले. पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने गाडीचे पायदान कापून अडकलेल्या मुस्ताक खानची सुटका केली. या दरम्यान प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता.

अपघातात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे–अमरावती गाडी तब्बल एक तास वीस मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. गाडी थांबून राहिल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या अपघाताने रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे केले असून स्थानिक प्रवाशांतून मोठी चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!