WhatsApp

लर्निंग लायसन्स प्रक्रियेत बदल आवश्यक; सरनाईक यांचा आरटीओ अधिकाऱ्यांना इशारा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी व्यक्त केले. मुंबई सेंट्रल आरटीओच्या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, केवळ कागदपत्रे आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नसून उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. काही ठिकाणी माकडांचे फोटो लावून आणि खोटी नावे देऊन लायसन्स मिळवल्याचे प्रकार समोर आले असून, यामुळे रस्ते अपघाताचा धोका वाढत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.



लायसन्स प्रक्रियेत गैरप्रकार वाढले
सध्या ऑनलाइन पद्धतीने लर्निंग लायसन्स सहज मिळते. रहिवासी पुरावा आणि परीक्षा फी भरल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे दिली की लगेच लायसन्स जारी होते. या प्रक्रियेत पळवाट असल्याने अनेक उमेदवारांना वाहन चालवण्याचा अनुभव नसतानाही लायसन्स मिळते. त्यामुळे ते स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण करतात. सरनाईक यांनी लायसन्स देताना उमेदवारांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले.

आरटीओ अधिकाऱ्यांना कानउघाडणी
सरनाईक यांनी भेटीदरम्यान दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांना प्रक्रिया विचारली. वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेताना सोबत पक्के लायसन्सधारक असणे आवश्यक आहे की नाही असा प्रश्न विचारल्यावर निरीक्षकांनी नकारात्मक उत्तर दिले. हे चुकीचे असल्याचे सांगून सरनाईक यांनी त्यांची कानउघाडणी केली. तसेच ‘लोकमत’च्या वृत्ताचा दाखला देत, एजंटच पक्क्या लायसन्सची चाचणी घेत असल्याचे वास्तव पाहता लायसन्स प्रक्रियेत हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना त्यांनी सर्व निरीक्षकांना दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!