अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या ५० टक्के एसटी प्रवास सवलतीसाठी आता नवा नियम लागू केला आहे. यानुसार, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकृत ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याआधी आधार कार्डावर सवलत मिळत होती, मात्र आता तो पर्याय रद्द करण्यात आला आहे.
नवीन नियम
महिला आणि ज्येष्ठ नागरिक आता केवळ एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र दाखवूनच ५० टक्के तिकिट सवलतीचा लाभ घेऊ शकतात. या ओळखपत्राशिवाय प्रवाशांना पूर्ण तिकीट दर भरावा लागेल.
ओळखपत्र अनिवार्य
एसटी महामंडळाकडून दिले जाणारे हे ओळखपत्र बनवून घेणे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. मार्च २०२३ पासून सुरू असलेल्या या योजनेचा लाभ आता केवळ अधिकृत ओळखपत्रावरच मिळणार आहे.