WhatsApp


किती दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीत घसरण पाहा आजचा भाव

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १२ मार्च २०२४ :- तर मार्च महिन्यातील भयावह तेजीला अखेर पहिल्यांदा ब्रेक लागला. गेल्या 10 दिवसांपासून सोन्यापाठापाठ चांदीने पण रेकॉर्ड ब्रेक केले. किंमती एकदम भडकल्या. सोन्याने 66,000 चा टप्पा ओलांडला. तर चांदीने पण 75 हजारांचा टप्पा ओलांडला. दरवाढीने ग्राहकांच्या डोक्यावर आठ्या आल्या. अनेकांना खरेदीला गेल्यावर तडजोड करावी लागली. जादा रक्कम मोजावी लागली.

सोने दहा दिवसांत 3,430 रुपयांनी वधारले. तर चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात सोने-चांदीच्या तेजीला ब्रेक लागला. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 12 March 2024).. सोन्याची फटकेबाजी – मार्च महिन्यातील दहा दिवसांत सोन्याने जोरदार बॅटिंग केली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण सोने महागले. 7 मार्च रोजी सोने 400 रुपयांनी महागले. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. 9 मार्च रोजी 540 रुपयांची वाढ झाली. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल दिसला नाही .तर सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,890 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा किंचित दिलासा – मार्च महिन्यात चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली.अखेरच्या टप्प्यात 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी चांदीत इतकीच वाढ झाली. 9 मार्च रोजी 200 रुपयांची दरवाढी झाली. 11 मार्च रोजी 100 रुपयांनी किंमती कमी झाल्या.

घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 65,646 रुपये, 23 कॅरेट 65,383 रुपये, 22 कॅरेट सोने 60,132 रुपये झाले.18 कॅरेट 49,235 रुपये, 14 कॅरेट सोने 38,403 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,547 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Leave a Comment

error: Content is protected !!