Finance Horoscope Today 12 September 2025 In Marathi : संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आज शुक्रवार असून मेषसह या राशींसाठी दिवस उत्तम असून विरोधकांवर मात कराल. प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. या राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च कमी करावा. कन्या सह या राशींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मकरसह या राशींसाठी धनलाभाचा योग आहे. चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते सविस्तरपणे पाहूया.
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 12 September 2025 : दुसऱ्यांच्या चूका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत हे सांगितले तर तुमची चांगली प्रगती होईल. शुक्रवार असून मेष, कुंभ आणि मकर राशींना विरोधकांवर मात करून धनलाभाचे योग आहेत, तर कर्क, तुळ आणि मीन राशींना व्यवसायात नवीन संधी मिळतील. धनु राशींसाठी अनावश्यक खर्च टाळणे आणि बजेट सांभाळणे महत्त्वाचे आहे, पण उत्पन्नाचे नवे मार्गही खुलतील. सर्व राशींनी संयम, नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवल्यास दिवस फलदायी ठरेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल, त्यांची आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.
मेष आर्थिक राशिफल – विरोधकांवर मात करणार :- मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला आहे. जुन्या मित्रांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. कामात उत्साह असेल आणि कामाची धडाडी पाहून विरोधक शांत होतील. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फ्रिलान्स काम करत असाल तर उत्तम संधी मिळेल. रात्री एखाद्या राजकीय कार्यक्रमात जाण्याचा योग आहे तिथे ओळखी वाढतील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य – ऑफिसमधील काम व्यवस्थित पूर्ण होणार :- वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. रिमोट काम करणाऱ्यांची कामे व्यवस्थित मार्गी लागतील. मालमत्तेशी संबंधित वादात नुकसान होऊ शकते. भौतिक सुखसुविधा वाढणार आहेत त्यामुळे समाधान मिळेल. तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर ठामपणे मांडण्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरण सुखद असेल आणि रात्री फिरायला जाण्याचा योग आहे.

मिथुन आर्थिक राशिभविष्य – अनावश्यक खर्च कमी करा :- मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारासाठी नवीन योजना आखणार आहात तसेच त्याबदद्ल ठोस निर्णय घेणार आहात. कर्जाची देणी चुकती होतील. आर्थिकदृष्ट्या दिवस संमिश्र राहील पण खर्चही होईल तेव्हा सावध राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील त्याचा लाभ घ्या.भोतिक सुखसुविधांवर तुम्ही खर्च करणार आहात. नवीन गोष्टी शिकण्याचे संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटकडे लक्ष द्या.
कर्क आर्थिक राशिभविष्य – सुख -समृद्धीचे योग :- कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून भौतिक सुख -समृद्धीचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नवीन डील किंवा कराराची शक्यता आहे. एखाद्या सरकारी प्रोजेक्टमध्ये तुमचा सहभाह महत्त्वाचा असेल. कुटुंबीय आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध राहतील आणि सगळेजण आज तुम्हाला मदत करतील. आज आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. तुमचा मानसन्मान वाढणार असून शुभकार्यावर खर्च होणार आहे.
सिंह आर्थिक राशिभविष्य – वादविवादापासून दूर राहा :- सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी आहे. प्रवास होणार आहे आणि प्रवासात तुम्हाला लाभ होणार आहे. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद झाल्यास कायदेशीर बाबतीत नवीन वळण येऊ शकते. त्यामुळे सावध राहा. तुमच्या योजना पूर्ण झाल्यामुळे फायदा होईल. अचानक पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे खर्चात वाढ होवू शकते. व्यवसायात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जुनी डील तुमच्या बाजूने पुन्हा होवू शकते.
कन्या आर्थिक राशिभविष्य – आर्थिक स्थितीत सुधारणार :- कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक आहे. निरर्थक वादावर तोडगा मिळाल्यामुळे ताणतणाव कमी होईल. तुम्ही तुमचे खर्च कमी केल्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणार होणार आहे. कुटुंबात काही कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची निंदा करतील. तुमची सर्व कामे आज पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण ठिक असेल, तुम्ही सकारात्मक राहा म्हणजे सगळंकाही ठिक होईल.
तुळ आर्थिक राशिफल – व्यवसायात नवीन संधी मिळेल :- तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनप्राप्तीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा दिली असेल तर यश मिळेल. राजकारणात असाल तर मानसन्मान वाढणार आहे. व्यवसायात नवीन संधी येणार आहे पण सखोल चौकशी करुन एखादी गोष्ट कार्यान्वीत करा. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या.
*वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – प्रवास सुखद, लाभदायक :- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक एखाद्या मोठ्या व्यक्तीमत्वासोबत किंवा राजकीय नेत्याची भेट होणार आहे. तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. खास करुन खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. प्रवासाचा योग असून त्यात तुम्हाला लाभ होणार आहे. गुंतवणुकिसाठी दिवस फारसा ठिक नाही. व्यवसायात नवे काम येणार आहे तुम्ही नियोजन नीट करा. ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.
धनू आर्थिक राशिभविष्य – व्यापारासाठी नवीन योजना तयार करणार :- धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या वाटेतील अडथळे दूर होणार आहेत. व्यापारासाठी नवीन योजना तयार होतील, ज्यामुळे भविष्यात धनलाभ होईल. तुमच्या कार्यात भावंडांचे सहकार्य मिळेल. काम वेळत पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल. पूजा-पाठ आणि सत्संग यामध्ये रूची वाढणार आहे.
मकर आर्थिक राशिफल – धनलाभाचे योग :- मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. धनलाभाचे योग असून बँक बॅलन्स वाढणार आहे. वाणीमधील गोडवा आणि कुशलता यामुळे शत्रूची कारस्थाने विफल होणार आहेत. पैशांच्या व्यवहाराबाबत सावध राहा, तुमचे धन अडकण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. ऑफिसमध्ये तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
कुंभ आर्थिक राशिफल – विरोधकांवर मात करणार :- कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस मेहनतीचा आहे. तुमची अपूर्ण कामे अथक मेहनत केल्यानंतर पूर्ण होणार आहेत. ऑफिसमध्ये तुम्ही सांगितलेले बदल सकारात्मक आणि फलदायी ठरतील त्यामुळे विरोधक शांत राहतील. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फार टेन्शन घेवू नका.अनावश्यक खर्च टाळा तसेच बजेट तयार करा. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. कुटुंबात वातावरण सुखद असेल.
मीन आर्थिक राशिभविष्य – व्यवसायात नवीन संधी मिळेल :- मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखद असून संपत्ती वाढणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये अधिक रुची राहील. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन डिल होणार आहे तुम्ही कामाचे वेळेनुसार नियोजन करा. तब्येतीमध्ये थोडे चढउतार राहतील, तुम्ही जास्त ताण घेवू नका. व्यवसायात नवीन संधी मिळतील त्याचा लाभ घ्या.