सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या SET जून २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पाटखेड जिल्हा अकोलाचे सुपुत्र सुपुत्र आणि सध्या अमरावती जिल्ह्यातील श्री वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी येथे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. नितीन अभिमान खंडारे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
लाइफ सायन्सेस या विषयात उत्तीर्ण होऊन डॉ. खंडारे यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, सहकारी आणि जवळच्या व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे. प्रा. डॉ. सौ. सोनाली नितीन खंडारे, माणिकराव बानाजी जंजाळ, रत्नमाला माणिकराव जंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल माणिकराव जंजाळ, आयु. ॲड. पूजा राहुल जंजाळ यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच स्वप्नील तायडे, प्रा. मोनाली तायडे, इंजिनिअर डॉ. प्रमोद अंभोरे यांसारख्या सहकाऱ्यांनी देखील या यशात सहकार्य केले. यशाची ही गाथा फक्त डॉ. खंडारे यांच्यासाठीच नव्हे तर वाडेगाव परिसरासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रा. डॉ. नितीन खंडारे यांचे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
